आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ परीक्षा नियंत्रकाच्या शोधात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या कठीण काळात परीक्षा विभागाची घडी बसविण्याचे कार्य परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात केले. सरत्या वर्षासोबतच 31 डिसेंबर रोजी ते कार्यकाळ पूर्ण करीत असल्याने विद्यापीठ नव्या परीक्षा नियंत्रकाच्या शोधात आहे. संकटाची अनेक आव्हाने पेलत डॉ.साळुंखे यांनी परीक्षा विभागाला दिशा देण्याचा प्रयत्न केला.

विद्यापीठाने वार्षिक परीक्षा पद्धतीतून ‘स्कूल सिस्टिम’ स्वीकारली. त्यामुळे वर्षातून दोनदा परीक्षा घेणे, कॅप सेंटर उभारणे, वेळेत व बिनचूक निकाल लावणे यासाठी विभागाची कसोटी लागली. त्यातच सलग दोन वष्रे प्राध्यापकांचे परीक्षा कामकाजाबाबत असहकार आंदोलन होते. पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे निकाल सर्वप्रथम घोषित करण्याकडे त्यांचा कल असे. संपाच्या काळातही वेळेत निकाल लागले. याबद्दल राज्यपाल कार्यालयाकडून वेळोवेळी परीक्षा विभाग अभिनंदनास पात्र ठरला. माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी त्यांच्यावर परीक्षा नियंत्रकांची जबाबदारी सोपविली होती. यापूर्वी कोणाला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नव्हता. नुकत्याच झालेल्या एम.ए.मराठी सत्र परीक्षेच्या पेपर फुटीवर परीक्षा नियंत्रक विभागाने पांघरूण घातल्याने त्यांच्या कारकीर्दीत एकमेव गालबोट लागले.