आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University Gold Medals For The Number Of Fourteen!

सोलापूर विद्यापीठ -सुवर्णपदकांची संख्या झाली आता चौदा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाच्या सुवर्णपदकांची संख्या आता 14 झाली आहे. प्रा. जी. एस. हारकूड अक्कलकोट (बी. ए. अर्थशास्त्र) व वै. रामचंद्र बाळकृष्ण बोधे (शिक्षणशास्त्र) या दोन नव्या सुवर्णपदकांची भर पडली आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात अव्वल येणार्‍यांना विद्यापीठातर्फे सुवर्णपदक दिले जाते.

कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बुधवारी झाली. तीत हा निर्णय झाला. कुलसचिव एस. के. माळी यांनी सचिव म्हणून कामकाज पाहिले. वित्त व लेखा अधिकारी पदासाठी निवड समितीने केलेली शिफारस स्वीकारून डॉ. बी. डी. कर्‍हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यापीठ अधिविभागाच्या विद्यार्थ्यांना सहलीच्या पॉकेट अलाऊन्समध्ये वाढ झाली आहे. 25 रुपये प्रति दिवस मिळेल. यापूर्वी तो 5 रुपये होता.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय, डॉ. बी. डी. कर्‍हाड नवे वित्त अधिकारी

कंत्राटी कर्मचार्‍यांना 10 टक्के वेतनवाढ

कंत्राटी कर्मचार्‍यांना येत्या 1 फेब्रुवारीपासून 10 टक्के पगारवाढ झाली. त्यात डाटा एंट्री ऑपरेटर, लेखनिक, वाहनचालक, प्रयोगशाळा साहाय्यक, परिचर, शिपाई, माळी, चौकीदार ही पदे आहेत.

रसायनशास्त्र संकुलाचे आता एनर्जी ऑडिट

मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंपनीकडून रसायनशास्त्र संकुल इमारतीचा ऊर्जा व्यवस्थापन अहवाल करून घेण्यास मान्यता देण्यात आली. कंपनी ऑडिट करणार आहे.

पेपरलेस कार्यालयाकडे विद्यापीठाची वाटचाल

सोलापूर विद्यापीठात ई-ऑफीस कार्यप्रणाली राबवण्यास, त्यानुसार आवश्यक ती यंत्रसामग्री खरेदी करण्यास व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.