आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरूंची सिनेटमधील उत्तरे दिशाभूल करणारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बहिष्कार अस्त्रानंतर सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)ने कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांना कोंडीत पकडण्यासाठी नवे अस्त्र बाहेर काढले आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सिनेटमध्ये कुलगुरूंकडून दिशाभूल, बेपर्वाई व चुकीची उत्तरे देण्यात आली असून, त्या पुष्ठय़ार्थ माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरांचा दाखला ‘सुटा’ने दिला आहे. सुटाने दीक्षांत समारंभावर बहिष्कार टाकल्यानंतर दोनच दिवसांत विद्यार्थी हित पुढे करीत मागे घेतला. दोन पावले सुटा मागे सरकल्यानंतर आता नव्याने आरोपाचे अस्त्र म्हणून माहिती अधिकारात हाती आलेली माहिती आणि प्रत्यक्ष विद्यापीठाने बैठकांमध्ये दिलेली माहिती यामधील तफावतीचे कागदी अस्त्र उगारले आहे. निर्णय व घोषणेमधील विसंगती असल्याचे बारा मुद्दे पत्रात उपस्थित केले आहेत.
सुटाच्या अस्वस्थचे कारण
बंडगर यांच्या काळात र्मजीतील व्यक्तींना अस्थायी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष बहाल केले गेले, आता कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी नियमांचा बडगा उचलल्याने सुटा संघटना अस्वस्थ झाली आहे.
चर्चेसाठी तयार आहोत
सुटाने केवळ आरोप करून विद्यापीठ प्रशासनाची बदनामी करू नये. प्रशासनाबद्दल काही आक्षेप असतील तर चर्चेअंती ते सुटू शकतात. त्यासाठी आपण स्वत:चर्चा करण्यास तयार आहोत.
-डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू सोलापूर विद्यापीठ
16 नोव्हेंबरच्या सिनेट सभेत दिलेली उत्तरे
1 याबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल.
2 उत्तरात केवळ तिघांचेच नावे दिली.
3 दोन अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक नेमले गेले.
माहिती अधिकारात दिलेली उत्तरे
1 प्रश्न: क्रमांक दोन : एजीपी 9000 चे प्राध्यापकांचे प्लेसमेंट कॅम्प कधी घेणार ?
6 ऑक्टोबर 2012 रोजी विद्यापीठ समितीने 11 जणांचे एजीपी 9000 प्लेसमेंटचा निर्णय घेतल्याची माहिती माहिती अधिकारात मिळाली.
2 प्रश्न : विविध अधिकार मंडळावरील कितीजणांचे सदस्यत्व रद्द केले ?
इंग्लिश अभ्यास मंडळाच्या सौ. सासनूर (संगमेश्वर महाविद्यालय) यांचे दडवले होते.
3 प्रश्न :कोण कोणत्या महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालकांची नेमणूक झालेली नाही ?
दोन अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक नेमले गेल्याचे सांगितले. नेमणूक न झालेल्या महाविद्यालयांची नावे अपेक्षित होती.