आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरू शोधाच्या हालचाली सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने कुलगुरू शोध समिती स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या 30 जुलै रोजी कुलगुरू डॉ. बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषद व व्यवस्थापन परिषद यांची संयुक्त बैठक आयोजिली आहे. तीत समितीतील विद्यापीठ प्रतिनिधीचे नाव निश्चित होणार आहे. कुलपती समितीचा अध्यक्ष नियुक्त करतील. तिसरा सदस्य विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष नियुक्त करतील.
अशी होते निवड - कुलगुरूंचा कार्यकाल संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर ही शोध समिती नेमली जाते. समितीने निश्चित प्रक्रियेनुसार कुलगुरू पदासाठी नावे पुढे येतात. त्यांच्या मुलाखती आदी प्रक्रिया होऊन नावे निश्चित केली जातात. ही पाच नावे कुलपती कार्यालयास पाठवली जातात. त्यातून एकाची निवड केली जाते. निवडीचा अंतिम अधिकार कुलपतींना आहे. नावे फेरविचारास्तव शोध समितीकडे परत पाठविण्याचा अधिकारही कुलपतींना आहे.
विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेस केवळ नावाची शिफारस करण्याचा अधिकार आहे. तो सदस्य विद्यापीठांशी संबंधित नसवा. तसेच विद्यापीठांतर्गत असणार्‍या शैक्षणिक संस्थेत कार्यरत नसावा, असा नियम आहे, अशी माहिती कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे यांनी दिली. समितीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) संचालकांचीही शिफारस करता येते, असेही त्यांनी सांगितले.