आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ नामकरण लढा चालवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे ही आमची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली आहे. ही मागणी मान्य करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. यात येत्या 28 मे रोजी सोलापुरात राज्यस्तरीय मोर्चा काढणार असल्याचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोमवारी येथे सांगितले.

धनगर समाजातील राज्यभरातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख नेते, पदाधिकारी या मोर्चात सहभागी होतील. दुपारी एक वाजता चार पुतळ्याजवळील अहल्यादेवी पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा सुरू होईल. पार्क चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चा पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. तेथे एक निवेदन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवींचे नाव द्यावे, अशी मागणी करणारा ठराव सोलापूर महापालिकेने केला आहे. तसा प्रस्तावही पाठवला होता. पण, राज्य सरकारने सोलापूर विद्यापीठाला नाव देता येणार नाही, असे 19 जानेवारीच्या पत्रानुसार कळल्याने आंदोलन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.