आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोलापूर विद्यापीठ’ याच नावावर सिनेटचे एकमत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठ नामांतर करण्याच्या चर्चेला सोलापूर विद्यापीठाच्या चर्चेला सिनेेट सभागृहाने चर्चेअंती पूर्णविराम दिला. आदरणीय व्यक्तींचे नावे सोलापूर विद्यापीठाला देण्यात यावे, यासाठी तब्बल २७ संघटनांनी विविध नावांचा प्रस्ताव विद्यापीठाला दिला होता. यावर सिनेेट सभागृहात विषय चर्चेला आला. मात्र एकाही सभासदाने इतर कोणत्याही नावाला पसंती दर्शविली नाही. सर्वानुमते एकच नाव तेही "सोलापूर विद्यापीठ' असेच राहिले पाहिजे, तसे असावे यावरच मतैक्य झाले, हे विशेष.

निवडणुकीपूर्वी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरबाबत विविध माध्यमातून चर्चा सुरू करण्यात आली होती. सिनेेट सभागृहाने ठराव करून तसा प्रस्ताव राज्यशासनाला पाठवावा असा सूरही उमटला. यानंतर विविध संघटना, विद्यार्थी संघ, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून विविध नावांचे एकूण २७ प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त झाले. मात्र कोणत्याही नावापेक्षा सोलापूर विद्यापीठ हेच नाव योग्य असल्याचे सभागृहाचे मत पडले. हे नाव शासनला कळविण्यात येणार आहे. सिनेेट बैठकीत वार्षिक लेखा परीक्षण अहवाल मान्यतेसह १३ विषयांवर चर्चा झाली.

ठराव शासनाला कळवणार
सिनेेटसदस्यांच्या विचारार्थ २७ प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सिनेेट सभागृहाने सर्वानुमते सोलापूर विद्यापीठ याच नावाला पसंती दिली आहे. हे मत विचारात घेऊन शासनाला हेच नाव कायम ठेवण्यात यावे, असा कळविण्यात येइल. शिवशरणमाळी, कुलसचिव,सोलापूर विद्यापीठ

सोलापूर हेच योग्य नाव
सिनेटसभागृहात विविध प्रस्तावांवर चर्चा झाली. सोलापूर विद्यापीठ या नावात सर्वसमावेशकता आहे, इतर नावे आदरणीय अशी आहेतच. पण केवळ एकच नाव द्यावयाचे असल्याने सर्वानुमते एकच नाव ठरले. प्रा.शेफाली विभुते, सिनेेटसदस्य
* द्वारकानाथ कोटणीस विद्यापीठ - एसएफआय संघटना
* अण्णाभाऊ साठे विद्यापीठ - मधुकर पठारे, अहमदनगर मातंग समाज, रमेश कांबळे दलित महासंघ
* संत नामदेव महाराज विद्यापीठ -चरणसिंग सप्रा
* महर्षी वाल्मीकीऋषी विद्यापीठ - महादेव कोंळी समाज युवक संघटना
* सुशीलकुमार शिंदे विद्यापीठ -रूस्तुम कंपली
* भावनाऋषी विद्यापीठ - मनोहर कुरापाटी, भावनाऋषी युवक संघटना