आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"शिवाजी"च्या पदवीधरांना आता सिनेटचे वेलकम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य होऊ इच्छिणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पदवीधरांसाठी आता नोंदणीची दारे खुली झाली आहेत. यापूर्वीच्या निर्णयानुसार केवळ सोलापूर विद्यापीठाच्या पदवीधरांसाठीच नोंदणी खुली करण्यात आली होती. याबाबत शाळा कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी निवेदन देऊन आवाज उठवला होता.
नव्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील २००७ पूर्वी कोल्हापूर विद्यापीठाचे पदवीधर असणाऱ्यांनाही आता सदस्य नोंदणी करता येईल. याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीकरणही विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव शिवशरण माळी यांनी दिली.
२००४ पूर्वी कोल्हापूर विद्यापीठाची पदवी घेतलेली असली तरी सोलापूर विद्यापीठाने सदस्य नोंदणी नाकारली होती. वस्तुत: सोलापूर जिल्ह्यातील पदवीधरांना नोंदणीचा अधिकार आहे. ते २००७ या काळात ज्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून पदवी गृहण केली त्यांनाही आता सिनेट सभागृह पदवीधर मतदार संघ सदस्य नोंदणी करता येईल. नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे, ते कमी करण्याची मागणी मात्र मान्य झाली नाही.
२००७ पूर्वीची पदवी
२००७ पूर्वी ज्यांनी कोल्हापूर विद्यापीठाची पदवी घेतली असेल त्यांनाही आता सदस्य नोंदणी करण्यासाठी परवानगी देण्यात अाली आहे. पदवीधर सदस्य नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क मात्र कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवशरण माळी, कुलसचिव
मागणीला आले यश
सिनेटपदवीधर सदस्य नोंदणीसाठी २००४ पूर्वी ज्यांनी कोल्हापूर विद्यापीठाची पदवी घेतली त्यांनाही अधिकार मिळावा, अशी मागणी कृती समितीच्या माध्यमातून केली होती. विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेतल्याने दिलासा मिळाला आहे.
गुरुनाथ वांगीकर, जिल्हाध्यक्ष,
माध्यमिक शाळा कृती समिती