आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University News In Marathi, Commerce Syllabus, Divya Marathi

बी.कॉम.च्या परीक्षेत निम्मे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे, सोलापूर विद्यापीठाचा अजब कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने 1 एप्रिल रोजी घेतलेल्या प्रथम वर्ष बी. कॉम. (वाणिज्य) सत्र परीक्षेत तब्बल 26 गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली. ही प्रश्नपत्रिका मात्र 50 गुणांचीच होती. पन्नास टक्केहून अधिक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याने विद्यापीठ याबाबत कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्यापार अर्थशास्त्र या विषयाचा पेपर विविध केंद्रांत घेण्यात आला. यातील 26 गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आल्याचे विद्यार्थ्यांना नंतर लक्षात आले. प्रत्यक्ष परीक्षेवेळी प्रश्न सोडवणे अवघड गेले. याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे निवेदन दिले.
चुकलेले प्रश्न असे
पेपर कोड नं. एसएलआर - बीएन 84 मधील प्रश्न क्रमांक मधील उपप्रश्न क्रमांक 4 हा 1 गुणासाठी, प्रश्न क्रमांक 3 मधील उपप्रश्न क्रमांक अ हा 5 गुणांसाठी , तर प्रश्न क्रमांक 4 मधील उपप्रश्न बी गुण 10 आणि प्रश्न क्रमांक 5 मधील उपप्रश्न बी गुण असे हे चुकलेले प्रश्न आहेत.
विद्यापीठाकडे निवेदन
पेपर सोडवताना यातील प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचे लक्षात आले होते. मात्र, पुढील पेपरचा अभ्यास करणे, परीक्षा देणे महत्त्वाचे होते. आता विद्यापीठाकडेही निवेदन दिले आहे. मात्र, या चुकींमुळे आमच्या निकालावर परिणाम होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.’’ पद्माकर मस्के, विद्यार्थी
अभ्यासक्रमाच्या बाहेरचेच प्रश्न
व्यापार अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात विद्यार्थांच्या तक्र ारी आल्या, त्यानुसार मी अभ्यासक्रम पाहिला तेव्हा त्यात तब्बल 26 गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कदाचित विद्यार्थांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. तेव्हा विद्यापीठाने याचा विचार करावा असे वाटते.’’ प्रा. पवन परदेशी
नुकसान होणार नाही
बी.कॉम. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे निवेदन प्राप्त झाले आहे, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्‍न विचारले गेले असल्याबाबत विद्यापीठ तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मत मागवणार आहे. त्यानंतर संबंधीत विषयाचे डीन यांचे मत लक्षात घेऊन परीक्षा विभागाला पुढील सूचना देण्यात येतील. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याबाबत विद्यार्थ्यांनी निश्चिंत असावे.’’ डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू