आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा झाली ऑफलाइन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने मार्चमध्ये विद्या परिषदेच्या निर्णयानुसार नव्या सत्रापासून बी. एस्सी. भाग एक व बी. ई. भाग एकच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन जाहीर केले होते. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची योजना ऑफलाइन म्हणजे तात्पुरती फाइलबंद झाली आहे. ऑनलाइन परीक्षा घेणे तुलनेने जास्त महागडे असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये एकच पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय स्वीकारला जाणार आहे. त्याच्या अंमलबजावणीतही एकवाक्यता असावी, यासाठी सर्वविद्यापीठांच्या समन्वयातून अंतिम निर्णय होईल, अशी माहिती कुलसचिव एस. के. माळी यांनी दिली.

सोलापूर विद्यापीठाने ऑनलाइन प्रक्रियेसाठी टेंडरही मागवले गेले होते. मात्र, खर्च अव्यावहारिकपणे वाढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सध्या ही योजना थांबवलेली आहे.

ऑनलाइनचा खर्च जास्त
ऑनलाइन परीक्षेचा खर्च तुलनेत जास्त आहे. सर्व विद्यापीठांच्या सहविचारातून निर्णय होईल.’’ डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू