सोलापूर - सोलापूर विद्यापीठात भरती बंदी उठवल्यानंतर 38 पदांसाठीची सरळसेवेद्वारे भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या 24 जूनला व्यवस्थापन समितीसमोर हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर जाहिरात व पुढील भरती प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे.
या भरतीअंतर्गत लिपिक -22 पदे, शिपाई -07, प्रयोगशाळा साहाय्यक -02, सांख्यिकी साहाय्यक -01, भांडारपाल -01, स्टेनो -01 याप्रमाणे पदे भरण्यात येतील. या संदर्भात कुलसचिव शिवशरण माळी म्हणाले, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषयाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. गतवेळी म्हणजे 2012 मध्ये ही भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाला होती. तेव्हा अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने सुरू होणार्या या भरतीसाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. दरम्यानच्या काळात शैक्षणिक पात्रता उंचावली असेल तर पुन्हा अर्ज करावा. नवा अर्ज विचारात घेतला जाईल, असे माळी यांनी सांगितले.
माजी कुलकुरू डॉ. बाबासाहेब बंडगर, तत्कालीन कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे यांच्या कार्यकाळात झालेल्या भरतीप्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. मोठ्या प्रमाणात तक्रारी गेल्याने संपूर्ण भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली . त्यानंतर अभय वाघ व डॉ. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन झाली. दरम्यान, भरती प्रक्रिया पुढे सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
परीक्षा नियंत्रक पदासाठी 12 अर्ज
विद्यापीठ नव्या परीक्षा नियंत्रक व वित्त व लेखाअधिकारीच्या शोधात आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. परीक्षा नियंत्रक पदासाठी 12, वित्त व लेखाधिकारी पदासाठी 08 अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाले. छाननी समिती दोन दिवसांत अर्जांची छाननी करणार आहे. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात येईल. या प्रक्रियेसाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. नवे अधिकारी रुजू होईपर्यंत परीक्षा नियंत्रक प्रभारीच असतील.
सध्या डॉ. एस.व्ही. लोणीकर यांच्याकडे प्रभारीपद आहे.
व्यवस्थापन समितीसमोर विषय
४राज्य शासनाने सोलापूर विद्यापीठावरील भरती बंदी उठवली. व्यवस्थापन समितीसमोर हा विषय ठेवण्यात येणार आहे. यानंतरच पुढील कार्यवाही सुरू होईल.
शिवशरण माळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ