आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University Saving 50 Thousand Electricity

सोलापूर विद्यापीठात होतेय दरमहा 50 हजारांची वीज बचत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठातील अंतर्गत रस्त्यांवर बसवण्यात आलेले 30 सौर पथदिवे रात्रभर आसमंत उजळून टाकतात. संपूर्ण प्रांगणात लख्ख प्रकाश असतो. केवळ दहा लाख रुपयांच्या खर्चात विद्यापीठाने प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये वाचवले आहेत. कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे यांनी ही माहिती दिली.

सौर दिव्यांची उपयुक्तता पाहून गेस्ट हाऊस, मुलींचे वसतिगृह, मुलांच्या वसतिगृहावर सोलार वॉटर हिटर बसवण्यात आले आहेत. यासाठी 13 लाख रुपये खर्च आला. 2010 पासून विद्यापीठात सौरऊर्जा वापराचा पथदर्शक उपक्रम सुरू आहे.


50 फूट परिसरात एक दिवा पुरेसा
30 अद्ययावत सौर पथदिवे
03 सौरऊज्रेवरील वॉटर हिटरचा वापर
02 वर्षांपासून कार्यान्वित