आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडघम सिनेटच्या निवडणुकीचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विद्यापीठ सिनेट सभागृहात विराजमान होण्यासाठी (सिनेटर) समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींना संधी असते. यात पदवीधर मतदार संघातून निवडून जाणे ही वरवर सोपी वाटणारी मात्र तितकीच चुरशीची प्रक्रिया असते. येत्या ऑगस्टमध्ये सिनेट सभागृह नव्याने अधिकारावर येणार आहे. 101 सदस्यांच्या या सभागृहात दहा सदस्य हे पदवीधर मतदार संघातून निवडले जातील. यासाठी सुटा संघटना आपले पॅनेल उभा करणार आहेच. पण नाराज उमेदवारांचेही पॅनेल उभे राहू शकते. त्यामुळेच ही निवडणूक चुरशीची ठरेल.
कोणहोऊ शकते सिनेटर?: कुलगुरू, कुलसचिव, विधान परिषदेचे सदस्य आणि कुलपती यांनी निर्देशित केलेले सदस्य, विधानसभेचे सदस्य, विधानपरिषदेचे सदस्य, विद्यापीठाचे पदाधिकारी, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, कुलगुरू नामनिर्देशित केलेले विद्यापीठातील विभागप्रमुख, संस्थाचालक, प्रौढ निरंतर शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण , बीसीयूडी विभागाचे संचालक, विद्यापीठ ग्रंथपाल, विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक, विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष, सचिव, शिक्षक प्राचार्य, जिप शिक्षण मंडळ प्रतिनिधी, मनपा प्रतिनिधी यांना सिनेट सभागृहाचे सदस्य अर्थात सिनेटर म्हणून निवडले जाते. यातील काही जागा पदसिद्ध पद्धतीने निवडल्या जातात.
पदवीधर मतदार संघात चुरस
पदवीधरमतदार संघातून दहा सदस्य निवडले जातील. यासाठी मतदारयादी नव्याने बनवण्यात येत आहे. ऑनलाइन मतदारांची नोंदणी सुरू आहे. गतवर्षी 2800 च्या आसपास मतदार नोंदणी झाली होती. यंदा यात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. सोलापूर विद्यापीठात सुटा संघटना सर्वात प्रबळ पॅनेल उभा करते. पदवीधर, शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक आदी मतदार संघात यंदा या पॅनेलला राज्य माध्यमिक शाळा कृती समितीकडून कडवे आव्हान मिळू शकते. पदव्युत्तर शिक्षक पाच जागा, शिक्षक मतदार संघातून १९ जागा, संस्था प्रतिनिधी आठ जागा, प्राचार्य संघातून १८ जागांवरही इच्छुक उमेदवार अधिक असतील तर निवडणूक होते. केवळ पदवीधर, शिक्षक, पदव्युत्तर जागांवरच नाही तर निवडणुकीच्या सर्वच जागांवर लढण्यासाठी सुटा संघटना सज्ज आहे. प्रा.देवेंद्र मदने