सोलापूर - भारतरत्न इंदिरा गांधी महाविद्यालय पारंपरिक अभ्यासक्रमासह नवीन अभ्यासक्रम सुरू करते. यामागे केवळ विद्यार्थीहित आहे. परंतु विद्यापीठ नियमांचा बडगा दाखवून विद्यार्थीहितालाच डावलत आहे. याबाबत राज्यपाल भवनाकडे तक्रार केल्याची माहिती "बिगसीई'चे अध्यक्ष रवी गायकवाड यांनी दिली.
एम. ई. अभ्यासक्रमापैकी वॉटर रिसोर्सेस, बायो मेडिकल तर एम. ई.च्या केमिकल या तीन विषयांच्या परीक्षाच घेण्यात आल्या नसल्याचा प्रकार उघड झाला. हे अभ्यासक्रम बिगसीई अभियांत्रिकीमधील आहेत. या विषयावर प्रकाश पडल्यानंतर बिगसीईचे गायकवाड यांनी
आपली बाजू मांडली. एम. ई. बायोमेडिकल विषयातील १२ प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी चार जणांनी फॉर्म भरले. त्यांच्या परीक्षा गतवर्षीच झाल्या. ते चौघेही उत्तीर्ण झाले. यावर्षी नव्याने प्रवेश नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान संभवत नाही, असेही श्री. गायकवाड म्हणाले.
विद्यापीठाकडूननाही प्रोत्साहन
वॉटररिसाेर्सेस केमिकल विषय केवळ आमच्याकडेच आहेत. तज्ज्ञ प्राध्यापकांना नेमले आहे. पण यूजीसी मान्यता नसल्याचे कारण पुढे करीत विद्यापीठ अभ्यास मंडळाची स्थापनाच केली नाही. वास्तविक अभ्यास मंडळ स्थापण्याचा संपूर्ण अधिकार विद्यापीठाकडेच आहे. विद्यापीठाचे जाचक नियम आड येत असल्याने इतर अभियांत्रिकी महाविद्यालये नव्या अभ्यासक्रमांचा प्रारंभ करीत नाहीत. एअरोनॅटिकल अभ्यासक्रम सुरू करण्यासही इच्छुक आहोत. मात्र विद्यापीठांकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने नाइलाजाने पारंपरिक अभ्यासक्रमांचीच कास धरावी लागत आहे, असे मत श्री. गायकवाड यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाची जबाबदारी
बीओएसमंडळच स्थापन केल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाकडे येते. अस्थायी मंडळ स्थापन करून मार्ग काढता आला असता. याबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहोत. वस्तुत: बीओएस मंडळ नसले तरी अभ्यासक्रमाला विद्यापीठाने मान्यता दिली आहे. पण अस्थायी मंडळही स्थापन करण्यात आले नाही. याबाबत राज्यपाल भवनाकडे दादही मागितली आहे.'' रवीगायकवाड, बिगसीई महाविद्यालय
मंडळस्थापन झाले नाही
बोर्डऑफ स्टडीज यांची बैठक झाल्यानंतरच परीक्षेसंदर्भातील कामकाज सुरू होते. बिगसीईतील तीन अभ्यासक्रमांसाठी बीओएस मंडळच अस्तित्वात नाही, त्यामुळे बैठक झाली नाही, पर्यायाने परीक्षा घेता आली नाही.'' बी.पी. पाटील, परीक्षा नियंत्रक