आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University Student Council Election On 15 October

सोलापूर विद्यापीठात स्टुडंट कौन्सिलसाठी 15 ला निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठ स्टुंडट कौन्सिलसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. यानुसार 15 ऑक्टोबरला स्टुडंट कौन्सिल अध्यक्ष व सचिवांची निवड घोषित होणार आहे.

कौन्सिलसाठी प्रत्येक तालुक्यातून एक व शहरातून चार असे 15 विद्यार्थी प्रतिनिधी गुणवत्तेच्या आधारे निवडले गेले आहेत. यातून एक अध्यक्ष व एक सचिव यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी या सदस्यांसाठी 15 ऑक्टोबर दुपारी 2 पर्यंत निवडणूक अर्ज भरता येईल. अर्ज मागे घेण्याची मुदत त्याच दिवशी 3.30 पर्यंत आहे. एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज राहिला तर मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक प्रा. प्रशांत नलवडे यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. प्रशांत नलवडे, डॉ. ए. ए. घनवट, एनएसएस समन्वयक डॉ. एम. जी. कांबळे, क्रीडा समन्वयक किरण चोकाककर काम पाहत आहेत.