आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University Teachers Association Protests Issue

सोलापूर विद्यापीठासमोर सुटा (सोलापूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन) संघटनेतर्फे निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूर विद्यापीठासमोर सुटा (सोलापूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन) संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. सुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. हनुमंतराव आवताडे, जनरल सचिव प्रा. देवेंद्र मदने, खजिनदार तानाजी मगर, उपाध्यक्ष डॉ. तानाजी फुलारी, डॉ. तुकाराम शिंदे, डॉ. फातिमा विजापुरे, सहसचिव प्रा. जाकीर मुलाणी, प्रा. अशोक कदम, सुटा खजिनदार प्रा. भारत जाधव, जिल्हा समन्वयक प्रा. एस. के. मठपती, प्रा. एच. के. कामठे, सिनेट सदस्य तानाजी कोळेकर, डॉ. अनिल बारबोले, प्रा. रजनी दळवी, डॉ. अँनी जॉन, डॉ. महादेव देशमुख, माजी परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे, प्राचार्य डॉ. एन. बी. पवार आदींसह सुमारे 150 प्राध्यापकांनी निदर्शनात सहभाग घेतला. विद्यापीठात पोलिसांचाही बंदोबस्त होता.
सुटा संघटनेच्या विविध आक्षेपांवर कुलसचिवांनी दिलेली उत्तरे ही गोलमाल व दिशाभूल करणारी आहेत, असे सुटा संघटनेचे म्हणणे आहे. यापूर्वी डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या कालावधीतील चुका दुरुस्त करण्याचा उद्देश असता तर फक्त अस्थायी मंडळाचे गठण करण्याचाच का प्रयत्न केला? सर्व चुका दुरुस्त करणे योग्य ठरले असते. अधिसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पूर्णत: चुकली असताना टायपोग्राफिकल चूक आहे असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे. परीक्षा नियंत्रकाचा पदभार देताना शासन निर्णयाला छेद बसला असला तरी कुलसचिवांनी शब्दांचा वापर जबाबदारीने करावा, असे सूचवणे अयोग्य आहे, आदी मुद्दे सुटा संघटनेने निदर्शनादरम्यान नव्याने उपस्थित केले.