आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी कुलगुरू म्हणायचे, ‘तुमचा काय संबंध?’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाकडे निकृष्ट असल्याची तक्रार केली असता तत्कालीन कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर हे ‘तमुचा काय संबंध?’ अशा शब्दांत विषयाला बगल देत असत. आता घोटाळाप्रकरणी जबाबदारी निश्चित झाल्याने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा तक्रारकर्ते यादगिरी कोंडा यांनी व्यक्त केली.

बाकडे घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. ए. ए. घनवट व डॉ. आर. आर. पाटील यांची एक समिती स्थापन झाली होती, ती तारीख होती 7 जुलै 2009. या समितीने अहवाल दिला ती तारीख होती 29 जून 2009. स्थापनेपूर्वी 7 दिवस आधीच समितीने अहवाल दिला की काय? या मुद्द्य़ाकडेही र्शी. कोंडा यांनी लक्ष वेधले.

विद्यापीठाने सांगलीच्या कंत्राटदाराकडून 300 बाकडे खरेदी केले. बाकड्यांसाठी वापरलेले लाकूड निकृष्ट होते. लाकडाची जाडीही कमी वापरली. निकृष्ट दर्जाचे बाकडे का स्वीकारले जातात हा प्रश्न होता. एक नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा हक्क मला होता. तरीही तत्कालीन कुलगुरू प्रश्नाला बगल द्यायचे. शेवटी राज्यपालांकडे तक्रार करून चौकशी करण्याची विनंती केली, असे आर्किटेक्ट कोंडा यांनी सांगितले.

विद्यापीठातील बाकडे खरेदी घोटाळ्याबाबत तत्कालीन संबंधित अधिकार्‍यांवर राज्यपाल भवनातून आवश्यक ती कारवाई करण्याबाबतचे पत्र कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी व्यवस्थापन परिषदेसमारे ठेवले. बाकडे घोटाळाप्रकरणी तत्कालीन कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर, तत्कालीन कुलसचिव डॉ. एम. एस. शेजूळ, तत्कालीन वित्त व लेखा अधिकारी डॉ. पी. बी. जोशी यांची संयुक्त जबाबदारी निश्चित झाली आहे.