आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University Vice Chancellor N N Maldaar On Seoul Tour

सेऊल येथील शिबिरासाठी कुलगुरू डॉ. मालदार रवाना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड मिनिस्टर अँड युनिव्हर्सिटी व्हाइसी चॅन्सलर्स फोरम 2013’ या जागतिक शिबिरासाठी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार आज रवाना झाले. या कालावधीत सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील वरिष्ठ प्रो. डॉ. एस. व्ही. लोणीकर प्रभारी कुलगुरू म्हणून काम पाहणार आहेत. आंतरराष्ट्रीय युवा फेलोशिपतर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

राज्यपाल कार्यालय, उच्च व तंत्रशिक्षण कार्यालयाच्या वतीने डॉ. मालदार यांचे नामनिर्देशन झाले. 12 ते 19 जुलै या कालावधीत हे जागतिक शिबिर होईल. यात फोरमचे अध्यक्ष डॉ. मुनटेक पार्क यांच्या अध्यक्षतेखाली 40 देशांतील 20 शिक्षणमंत्री व जवळपास 50 कुलगुरू सहभागी होत आहेत.

शिबिरात युवा नेतृत्व निर्माण करणे, विद्यार्थ्यांचे मानवी मूल्य, तरुणांची भावी वाटचाल, तरुणांसमोरील प्रश्न समजावून घेऊन त्यांच्यामध्ये तांत्रिक व उच्च शिक्षणाची आवड व मजबूत निर्णयक्षमता निर्माण करणे यावर सखोल अभ्यास व चर्चा होणार आहे. डॉ. मालदार म्हणाले, विविध सांस्कृतिक फिल्ड अँक्टिव्हिटी, नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण या सर्व सहभागातून युवा विद्यार्थ्यांना अधिक चांगले भविष्य देण्यासाठी या शिबिरातून भर दिला जाईल.