आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवा महोत्सवनगरी-
वडाळा- ‘शिवाजी द बॉस’ असे सिद्ध करीत बाश्रीच्या शिवाजी महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशिपवर सातव्या वेळेस आपले नाव कोरले. यंदा चॅम्पियनशिपचे स्वप्न पाहणारे वालचंद या स्पध्रेत सलग नवव्या वेळेसही द्वितीय स्थानावर राहिले. यामुळे वालचंदच्या विद्यार्थ्यांनी निषेधाच्या घोषणा देत, पार्सिलिटी केल्याचा आरोप केला. विजयी ट्रॉफीही स्वीकारली नाही. गोल्डन गर्ल श्रद्धा हुल्लेनवरू हिने गोल्डन गर्लचा किताबही स्वीकारला नाही.
पारितोषिक वितरणानंतर विजयी संघ व पराभूत संघांच्या काही विद्यार्थ्यांमध्ये गंभीर हाणामारीही झाली. सोलापूर विद्यापीठाच्या महोत्सवात अशा घटना प्रथमच घडल्या. शिवाजी महाविद्यालयाच्या संघाकडे विजयाची ट्रॉफी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर वालचंद महाविद्यालयाने आपल्या संघाचे पारितोषिक स्वीकारण्यात मुळीच इंटरेस्ट दाखवला नाही. गोल्डल गर्ल म्हणून वालचंदच्या श्रद्धा हुल्लेनवरूचे नाव घोषित झाले. मात्र तरीही तिने तो पुरस्कार व्यासपीठावर येऊन स्वीकारला नाही. गुणवत्तेला डावलले, अन्याय झाला, पार्सिलिटी झाली म्हणून भीक दिल्यासारखा हा पुरस्कार घोषित झाला, म्हणून स्वीकारला नाही, असे श्रद्धा हुल्लेनवरू हिने सांगितले. वालचंदचे संघव्यवस्थापक प्रा. राजेश माळी म्हणाले, विद्यापीठ संयोजन समितीने विश्वासपूर्वक कार्य केले नाही हे विद्यार्थ्यांच्याही लक्षात आल्याने त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. संघव्यवस्थापक म्हणून पुरस्कार स्वीकारत आहे. पुढील वर्षी महोत्सवात सहभाग घ्यायचा नाही, या निर्णयापर्यंत विद्यार्थी का येताहेत हे संयोजन समितीनेही लक्षात घ्यावे.
चार दिवसीय युवा महोत्सवाचा समारोप मंगळवारी प्रयास संस्था अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांच्या उपस्थितीत झाला. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार अध्यक्षस्थानी होते. लोकमंगल समूहाचे अध्यक्ष सुभाष देशमुख, स्वागताध्यक्ष रोहन देशमुख, बीसीयूडी संचालक डॉ. भीमाशंकर भांजे, विद्यार्थी मंडळ संचालक प्रा. प्रशांत नलवडे , पोलिस उपअधीक्षक मनीषा दुबुले यांची उपस्थिती होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा... सलग दुसर्यांदा गोल्डन बॉय ठरला मुकुंद जाधव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.