आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या अकराव्या युवा महोत्सवाचे वेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-सोलापूरविद्यापीठाच्या अकराव्या युवा महोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी बाप्पाच्या अागमनामुळे थोडे विसावले असले तरी लवकरच युवा महोत्सवाचा फिव्हर प्रत्येक महािवद्यालयातून चढणार आहे. सध्या विविध महािवद्यालयातून सरावाचे सूर ऐकू येऊ लागले आहेत.
यंदाचा अकरावा युवा महोत्सव बार्शीच्या शिवाजी महािवद्यालयात होणार आहे. विद्यापीठाच्या यापूर्वीच्या युवा महोत्सवात चक्क सात वेळेस जनरल चॅिम्पयनशीप पटकािवणारा संघ म्हणजे िशवाजी महािवद्यालय. यंदा हा संघ विजेतेपदाच्या हॅटट्रिकच्या तयारीला लागलेला आहे. म्हणजे गत दोनही युवा महोत्सवात शिवाजी महाविद्यालयाचा संघ चॅम्पियन ठरलाय. यंदाही चॅम्पियनिशप पटकाविण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगली आहे. त्या दिशेने तयारी सुरू असल्याचे मत महाविद्यालयातील खंडू डोईजोडे याने सांगितले.
वालचंद महाविद्यालय सलग उपविजेते ठरते आहे. यंदा मात्र जनरल चॅम्पियनिशपवर वालचंदचे नाव कोरायचेच, अशी जिद्द संघाने बाळगली आहे. त्यादिशेनेच तयारी सुरू असल्याचे विद्यार्थी प्रतीक शिंगे यांनी सांगितले. एकूणच युवा महोत्सव म्हणजे केवळ हार जीत नव्हे. हे केवळ सादरीकरण नव्हे. सांस्कृतिक जगातील हा युवांचा हुंकार उन्मेषी अविष्कार ठरावा, विद्यार्थ्याचे व्यक्तिमतत्त्व अष्टपैलू व्हावे हा एक प्रयत्न असतो. युवा महोत्सव त्यासाठीचे एक माध्यम आहे, असे मत विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. प्रशांत नलवडे यांनी व्यक्त केले.