आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संकुल’ऐवजी विभाग प्रणाली; सोलापूर विद्यापीठाचा विद्यार्थी हितासह गुणात्मक वाढीचा संकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘संकुल’ऐवजी विषयनिहाय ‘विभाग’ अशी अभ्यासक्रम प्रणाली राबवण्याच्या हालचाली सोलापूर विद्यापीठाने सुरू केल्या आहेत. सध्या विद्यापीठात सात विविध संकुले आहेत, त्याऐवजी नव्याने विषयनिहाय 34 विभाग कार्यान्वित करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. पूर्वाश्रमीची ही पद्धत स्वीकारली तर विद्यार्थी हिताबरोबरच विद्यापीठाची गुणवत्ता व विकासाची गतिशीलता वाढवता येईल, असा कयास वर्तविला जात आहे. सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेवेळी म्हणजे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या कारकीर्दीत विषयनिहाय ‘विभाग पद्धती’ कार्यान्वित होती. तीन विभागाला अनुदानाची मंजुरी मिळाली. आणखी दोन विभाग अनुदानावर सुरू करण्याचा प्रस्ताव दिला गेला असता तर सोलापूर विद्यापीठाला तेव्हाच म्हणजे 2007 मध्येच बारा ब म्हणजे यूजीसीची मान्यता व अनुदान प्राप्त झाले असते. कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी नांदेड विद्यापीठाचे अनुकरण केले व विभाग पद्धती अनुसरण्याऐवजी संकुल सिस्टिम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. शिवाजी विद्यापीठ, मुंबई व पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी व नावाजलेल्या विद्यापीठात विभाग पद्धतच कार्यान्वित आहे. सोलापूर विद्यापीठात संकुल सिस्टिममुळे कमी शिक्षक, कमी पदे आणि विकासाला वावही नाही, अशी स्थिती निर्माण झाली.
अजूनही विद्यापीठाला आजमितीस 650 शिक्षकेतर कर्मचा-यांची गरज असताना केवळ मंजूर झालेली 110 पदेच भरण्याची अनुमती आहे. यातील 38 पदे अजूनही रिक्तच आहेत. ही भरती लवकरच होईल. पण मुळात कमी कर्मचारी संख्येचा, कमी शिक्षक संख्येचा विषय कधी ऐरणीवर येत नाही. कशाला हवा निधी ? कशाला हवीत इतकी पदे ? एका जिल्ह्यापुरते तर आहे विद्यापीठ, असे सांगण्यात येते. साहजिकच हा प्रश्न कायम अनुत्तरीत राहिला. जिल्ह्यापुरते विद्यापीठ असले तरी संलग्नित 119 महाविद्यालये आणि 80 हजार विद्यार्थी संख्या पाहता वर्कलोड मोठा आहे. परंतु लोकप्रतिनिधी व शासनही याबाबत सतर्क नसल्याचे दिसते.
विद्यापरिषद, व्यवस्थापन समितीचा निर्णय
विद्या परिषद व व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विभाग पद्धत स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभाग पद्धतीत सर्वांना स्वायत्तता मिळेल. पर्यायाने सोलापूर विद्यापीठाचा सर्वांगीण विकासही साधता येईल.’’ डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ