आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारपासून सोलापुरला होणार तीन दिवसांआड पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- येत्या 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. या दरम्यान तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे यांनी दिली.

होनमुर्गी फाटा ते वडकबाळ पुलादरम्यान असलेल्या 1200 मिमी व्यासाची 1.6 किमी पाइपलाइन नव्याने घालण्यात आली आहे. त्याची जोडणी 17 व 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. रोज 55 एमएलडी (दशलक्ष लिटर) पाण्याचा तुटवडा भासणार आहे.

नव्याने टाकलेल्या 1.6 किमी पाइपलाइनचे काम करण्यात आले. त्याची जोडणी बकरीईदनंतर 17 आणि 18 ऑक्टोबर पासून करण्यात येणार आहे. टाकळी पंप हाऊस, पाइपलाइनचे इतर काम, सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातील कामे करण्याचे नियेाजन आहे. दोन दिवसांच्या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा उजनी, हिप्परगा तलाव येथील स्रोतावर अवलंबून आहे.

तीन दिवसांआड पाणी
रोज 55 एमएलडी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आठ दिवस तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी तोंडी मान्यता दिली आहे. जोडणीनंतर 21 एमएलडी पाणी वाढणार आहे.’’ बी. एस. आहिरे, सार्वजनिक आरोग्य अभियंता