आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यासाठी फक्त वर्षभर त्रास सहन करा - शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शहराला सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. एनटीपीसीच्या माध्यमातून दुहेरी जलवाहिनीचे काम वर्षभरात पूर्ण होईल. त्यामुळे सोलापूरकरांना पाण्यासाठी वर्षभर त्रास सहन करावा लागणार आहे. त्यानंतर पाण्याची समस्या राहणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी सांगितले. दक्षता समिती व खासदार फंड खर्चाबाबत आढावा बैठकीसाठी शिंदे शनिवारी सोलापुरात आले होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या उजनीतून एक जलवाहिनी
असून, वर्षभरात दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पाण्याचा प्रश्न दूर होईल, असे त्यांनी सांगितले.