आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरच्या महिलांनी घेतले ट्रेकिंगचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महिलांना आपल्या ट्रेकिंगच्या छंदाला जपता यावे, पुढे नेता यावे म्हणून विजयालक्ष्मी बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब एअर पोर्ट शाखेने श्रावण महिन्यात श्री रामलिंग देवस्थानच्या श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी दुर्गा टेकडीचे ट्रेकिंग के ले. उस्मानाबादच्या कुशीत विसावलेली दुर्गा टेकडी सर करत विजयालक्ष्मीच्या अभिंजली जाधव यांनी महिलांना ट्रेकिंगचा मंत्र दिला. दिवाळीच्या सुटीच्या काळात रायगड व राजगड किल्ल्याच्या चढाईसाठी प्राथमिक फेरी म्हणून महिलांनी हा प्रयोग केला होता. सकाळी साडेसहा वाजता निघालेल्या या महिलांनी दुपारी दोनपर्यंत चालत चढाई पूर्ण केली. ब्रिटिश काळाचे विश्रामगृह आणि छोटेसे महादेवाचे मंदिर अशी वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनाची ठिकाणे दुर्गा टेकडीवर आहेत.

या महिलांनी घेतले ट्रेकिंगचे धडे
लता ढेरे, मृणालिनी मोरे, योगिता पाटील, ऊर्मिला अनपट, ममता अनपट, वासंती मुळे, शांता येळंबकर, अनिषा जाधव, मनाली जाधव, संजिवनी मुळे, निशा भगरे, दीपाली धस या महिलांनी ट्रेकिंगचे धडे घेतले आहेत. या महिलांना अभिंजली जाधव यांनी राजगड व रायगड व तोरणा गडाच्या चढाईच्या वेळचे काही प्रसंग आणि अनुभव सांगितले.

पायवाटेने जाण्याचा धाडसी प्रयोग
या टेकडीला जाताना सुरुवातीला रामलिंगाचे दर्शन घेऊन पायवाटेने त्यांनी चढाई केली. काही भाग जंगलाचा असणार्‍या या भागाला जोडणारा गुरुकुलचा भाग म्हणजे हिरवळीने फुललेले जंगल आहे. त्यात या महिलांनी आपले धाडस दाखवत पायवाटेने जाण्याचा प्रयोग केला आहे.

हे दिले सल्ले : ट्रेकिंगला जाताना काय सोबत घ्यावे, काय घेऊ नये. पोशाख काय करावा, शिवाय रस्त्यांची निवड कशी करावी, मुरूम व दगड आल्यावर कसे चढावे, पाण्याच्या बाजूने चालताना, झाडाझुडपांच्या बाजूने चालताना, अंधारात कशी काळजी घ्यावी, असे सर्व मुद्दे महिलांना समजावून सांगिंतले.

महिलांनी धाडसी बनावे
महिलांनी आपल्या चौकटीबाहेरच्या कामांना महत्त्व द्यावे. आपल्या आवडी-निवडी जपाव्यात म्हणून हा प्रयत्न केला आहे. दिवाळीच्या काळात हा प्रयोग महाराष्ट्रतील अवघड किल्ल्यावर चढून जाण्यासाठी केला जाणार आहे. शांता येळंबकर, अध्यक्षा, रोटरी

केल्याने होत आहे रे ..
महिलांनी आपले काम करताना आपल्या आवडी-निवडी जाणून त्या जपाव्यात. किल्ला किंवा टेकडी चढताना स्त्री ही चपखलपणे चढू शकते हे सत्य आहे. त्यात वयाचा मुद्दा येत नाही. ईच्छा असेल तर कोणतेही काम शक्य आहे. अभिंजली जाधव, सदस्य, विजयालक्ष्मी ट्रेकिंग प्रशिक्षक