आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-यशवंतपूर रोजसाठी हालचाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आठवड्यातून तीन दिवस धावणारी सोलापूर-यशवंतपूर (बंगळुरू) एक्स्प्रेस रोज धावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे झाल्यापासून हालचाली वाढलेल्या आहे.

डब्यांच्या संख्येतही वाढ करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे समजते. सोलापूर रेल्वे प्रशासनाने याला अधिकृत दुजोरा दिला नसला तरीही याची सूत्रे गुलबग्र्याहून हलत असल्याची माहिती पुढे येत आहे. गुलबर्गा येथील असलेले र्शी. खर्गे हा बदल करण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. सोलापूरहून ही गाडी सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावते. रोजच्या धावण्याने सोलापूर व गुलबग्र्याच्या प्रवाशांची सोय होणार आहे. सध्या 19 डबे आहेत. ते 22 होणार आहेत.

अद्याप आदेश नाहीत
सोलापूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या बदलाचा रेल्वे बोर्डाकडून अद्याप आदेश मिळालेला नाही. ते मिळाल्यानंतर खरं समजेल. याहून अधिक काही सांगता येणार नाही.’’ ए. के. प्रसाद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक