आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Zilha Parishad Installing Rain Measurment

सोलापूर जिल्हा परिषदेचीही आता अन्य गावांत पर्जन्यमापके!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावाच्या शिवारात पाऊस मोजण्यासाठी स्वतंत्र पर्जन्यमापक यंत्र बसवण्याचा निर्णय बुधवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बसवण्यात येणारी 91 गावे सोडून अन्य गावांमध्ये जिल्हा परिषद पर्जन्यमापके बसणार आहे. काही गावांमध्ये भरपूर पाऊस शेजारील गाव कोरडे असे चित्र असते. पण, पावसाच्या आकडेवारीमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवलेल्या गावातील पावसाची नोंद होते. त्याचा फटका इतर गावातील लोकांना बसत आहे. गावाच्या शिवारात पडलेल्या पावसाची आकडेवारी समजल्यास गावकर्‍यांना शेती व पाण्याचे नियोजन करता येईल. गावात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीची सरासरी काढून ग्रामसभेत त्या शिवारात कोणती पिके घ्यावीत, भविष्यात पिण्याचे पाण्याचे नियोजन कसे करावे, याबाबतचा गावकरी निर्णय घेतील, असे ते म्हणाले. भूजल सर्वेक्षण विभागातर्फे गावातील निरीक्षण विहिरी निश्चित करून गावातील भजूल पातळीचा अभ्यास करण्याचे प्रशिक्षण कर्मचार्‍यांना देण्यात येईल. त्या विहिरीच्या माध्यमातून गावाचा जलालेख काढण्यात येणार असल्याचे गुळवे यांनी सांगितले.