आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Zilha Parishad News In Marathi, Deputy Chief Executive Officer, Divya Marathi

निवडणूक कामात हलगर्जी: उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन विभाग) प्रभू जाधव, कनिष्ठ साहाय्यक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील अधिकारी एम. एस. सुतार या दोघांवर रविवारी रात्री सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला. धर्मराज पटणे (रा. जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
17 मार्च ते 25 एप्रिल या कालावधीत दोघांकडे रामवाडी गोडावूनमधील स्ट्राँग ग्रीन (ईजीएम) मशिन विधानसभानिहाय वाटप करणे, ती लावून घेणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्या कामात हलगर्जीपणा केला. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही. टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.