आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद राखीव, दि.ग्गजांचा उपाध्यक्षपदावर आहे डोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्‍हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा आपल्या मतदारसंघाला अध्यक्ष अथवा उपाध्यक्षपद मिळवून विधानसभा निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी स्वत:च्या गटाचा उमेदवार पुढे केल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी या पदांच्या निवडीसाठी निरीक्षकांना पाठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता गृहित धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने उपाध्यक्षपद मिळवण्याची व्यूहरचना आखली आहे.

जिल्‍हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची रविवारी निवड होणार आहे. त्यावरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद वाढल्याने हा ितढा सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घेण्यात आली. मात्र, तेथे कोणताही निर्णय झाल्याने स्थानिक नेते ठोस निर्णयाशिवाय हात हलवत परतले. नावे निश्चित केल्यास पुन्हा गटबाजी उफाळेल आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला फटका बसेल, या धास्तीने वरिष्ठ नेत्यांनी पक्षनिरीक्षक पाठविण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी निरीक्षक सर्व सदस्यांशी चर्चा करून उमेदवार जाहीर करतील. निवडीवेळी गटबाजी झाल्यास सदस्यांवर ठपका ठेवून मोकळे व्हायचे आणि आपला शब्द स्थािनक नेते सदस्यांनी पाळला नाही, हा संदेशही लोकांत जाऊ नये, यासाठी वरिष्ठ नेत्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे यावरून दिसते. नेत्यांचा निर्णय पाळल्याचा संदेश लोकांत गेल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची त्यांना भीती आहे.

अध्यक्षपद महिलेसाठी खुले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळींनी उपाध्यक्षपदावर लक्ष केंद्रित केले आहे. मागील जिल्‍हा परिषदेत सुरवातीची अडीच वर्षे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी अध्यक्षपद होते. त्यावेळी जिल्‍हा परिषदेच्या कारभाराची सूत्रे उपाध्यक्षाच्याच हाती होती. त्यामुळे यावेळेसह अध्यक्षपदावर महिला असल्याने उपाध्यक्षाच्या हाती सत्ता एकवटली जाण्याची चिन्‍हे आहेत. त्या दृष्टीने इच्छुकांकडून व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महायुतीत गेलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतेमंडळींनीही अध्यक्षपद आपल्या गटाला मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तीच भूमिका काँग्रेसचे नेते आणि सदस्यांची आहे. अध्यक्षपदासाठी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसऱ्या गटाने उपाध्यक्षपदासह विषय समित्यांवर वर्चस्व मिळवून जिल्‍हा परिषदेची सत्ता ताब्यात ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. मोहिते कुटुंबातील सदस्य उपाध्यक्षपदासाठी पुढे आल्यास राष्ट्रवादीतील शिंदे गटाकडून पुन्हा विरोध होण्याची शक्यता आहे.
यांची नावे आहेत चर्चेत
अडीचवर्षांपूर्वी विषय समितीच्या निवडीवेळी गटबाजीमुळे पराभूत झालेले बाबाराजे देशमुख यांना उपाध्यक्षपदाच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या मोहोळ तालुक्यातील आष्टीच्या शीतल पाटील, अनगरच्या सीमा पाटील आणि सांगोल्यातील जयमाला गायकवाड पंढरपूरच्या सुकेशिनी देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे.