आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अध्यक्षपदासाठी गॉडफादरमार्फत इच्छुकांचे प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक रविवारी होणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक सकाळी नऊ वाजता सदस्यांची बैठक घेऊन उमेदवाराची घोषणा करणार आहेत. अध्यक्ष उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सदस्यांना लागली आहे.

इतर समिती सभापतिपदांसाठीचे इच्छुक गॉडफादर मार्फत लॉबिंग करीत आहेत. सरपंच पदापासून राजकीय प्रवास सुरू केलेल्या अनगरच्या सीमा पाटील या पदासाठी इच्छुक आहेत. धाडसी, अभ्यासू स्पष्ट वक्त्या अशी ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहिते शिंदे गटाशी त्यांची जवळीक आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्यामार्फेत त्यांनी फििल्डंग लावली आहे

आष्टी (ता. मोहोळ) येथील सदस्य शीतल पाटील यांनीही माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरेंकडे अध्यक्षपदासाठी रेटा लावला आहे. त्यांचे पती लालासाहेब हे डोंगरेंचे समर्थक कार्यकर्ते आहेत.

महिला बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड याही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांचे बंधू आमदार दीपक साळुंके-पाटील यांच्यामार्फत त्या प्रयत्न करीत आहेत.

कासेगाव (ता. पंढरपूर) येथील सुकेशिनी देशमुख या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. मोहिते परिचारक गटाबरोबर देशमुख कुटुंबीयांचे सलोख्याचे संबंध आहेत.

मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील ज्योती मार्तंडे यांचेही नाव अध्यक्षपदासाठी पुढे रेटले जात आहे. सोलापूर बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे यांचे मोहिते शिंदे गटाबरोबर सलोख्याचे संबंध आहेत.

उपाध्यक्ष सभापती पदासाठीही इच्छुकांची तयारी सुरू आहे. काँग्रेसने समान वाटा मागितला आहे. उपाध्यक्षपद अर्थ-बांधकाम समिती, शिक्षण-आरोग्य अशा महत्त्वाच्या समित्यांवर त्यांचा दावा आहे.