आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapurite Raja Jadhav Play Small Role In Chennai Express

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये सोलापूरकर राजा जाधव बाऊन्सरच्या भूमिकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरचे नाट्य कलावंत राजा जाधव बहुचर्चित ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधून पडद्यावर झळकणार आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित व शाहरूख खान मुख्य अभिनेता असलेल्या या चित्रपटात जाधव यांची बाऊन्सरची छोटीशी भूमिका आहे.


शिक्षक ते मनस्वी कलावंत
जाधव सोलापूरच्या बालकामगार प्रकल्पातील शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. गेली अनेक वर्षे विविध नाटकांत त्यांनी अभिनय केले. आता या चित्रपटात काम करत रूपेरी पडद्याच्या प्रवासाची सुरुवात के ली आहे. त्यांनी 20 नाटके व 15 एकांकिकांमध्ये काम केले आहे. तर 15 नाटकांचे व एकांकिकांचे दिग्दर्शन केले आहे.


असा जपला अभिनय वेड
अभिनयाच्या ध्यासाने ही संधी मिळाली असे सांगत जाधव यांनी त्याच्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या. हरिभाई शाळेत असताना त्यांनी नाटकाला महत्त्व दिले. आई अंगणवाडीची शिक्षिका व बाबा हे मिल कामगार होते. त्यांना जाधव यांचे नाट्यक्षेत्रात अभिनय करणे पटत नव्हते. मात्र, जाधव यांनी शिक्षणासह आपली कला जपली.