आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - उजनी जलाशयात उणे 27 टक्के साठा आहे. सरासरी पाऊस पडला तरी धरण भरणे कठीणच आहे, असा हवामान खात्याचा अहवाल आहे. सोलापूरकरांचे जीवन उजनी जलाशयावर अवलंबून असल्याने पुढील दोन वर्षं चिंतेची आहेत, अशी भीती राज्याचे सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. जिल्ह्यात साखर कारखाने वाढले, ऊस लागवडीचे क्षेत्रही वाढले. उजनी जलाशयाच्या डावा आणि उजवा कालव्यातील पाण्याद्वारे उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तेथे फक्त 16 टक्के ठिबक सिंचन पद्धत दिसून येते. ही बाब भविष्याच्या दृष्टीने गंभीर आहे. माळशिरस, पंढरपूर, माढा आणि करमाळा या बागायती तालुक्यातील पातळी तीन मीटरने खोल गेली आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन ठिबक पद्धतीनेच घ्यावे लागेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.