आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली फेअरमध्ये चमकणार सोलापूरचे युवा चित्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पारंपरिक आणि आधुनिक विषयांवर चित्र रेखाटणारे सोलापूरचे युवा चित्रकार सचिन खरात, कृष्णा कुचन, किरण व्हटकर (अक्कलकोट) आणि आनंद साई हे दिल्लीमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल अला प्रायमा आर्ट फेअरमध्ये सहभाग नोंदवत आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमध्ये ११ ते १५ डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रकला, शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी हे आयोजन आहे. विविध देशातील कलाकारांचा यात सहभाग असेल. सोलापूरच्या चित्रकारांची प्रत्येकी सात चित्रे यामध्ये असतील.
अशा प्रदर्शनांत भाग घेतल्यामुळे कलावंतांचा आत्मविश्वास वाढतो. अनेक कलाकृतींची विक्रीही होते. अनेक जाणकार मंडळी कलेचे कौतुक करताना उणिवा दाखवून देतात. त्यातून व्यावसायिक आणि कलात्मक पातळीवरची आव्हाने समजून घेण्यास मदत होते अशी भावना सचिन खरात याने व्यक्त केली.
अला प्रायमा म्हणजे काय?
हीइटालियन कला संकल्पना आहे. कलाकाराने एकाच बैठकीत आपली कलाकृती साकारणे म्हणजेच अला प्रायमा असे त्याला संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही कलाप्रेमी मंडळी एकत्र येऊन दिल्लीमध्ये आर्ट फेअर करत आहेत.
किरण व्हटकर
हामूळचा अक्कलकोटचा. चारकोल आणि आॅईल कलरच्या माध्यमातून व्यक्ती वस्तुचित्रण हा त्याचा विषय आहे. व्यक्तीचित्रांमध्ये नात्यांमधले भाव साकारण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या इंडिया आर्ट फेिस्टव्हलमध्ये त्याने सहभाग नोंदविला होता.
आनंद साई
चारकोल,ऑईल कलरच्या माध्यमातून चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न सध्या आनंद करत आहे. आषाढ महिन्यात मुलींच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव हा त्याच्या चित्रांचा विषय आहे. रंगावलीच्या माध्यमातून तो महिलांचे हळूवार भावबंध उलगडण्याचा प्रयत्न करतोय. प्रदर्शनात सहभागी होण्याची त्याची पहिलीच वेळ आहे.
कृष्णा कुचन
वॉटरकलरद्वारे रेल्वे या विषयावर त्याने रेखाटलेली चित्रे बंगळुरू, लंडन येथील व्यावसायिक गॅलरींमध्ये समाविष्ट आहेत. रेल्वे इंजिनचे विविध प्रकार, स्थानकावरील विविध प्रसंग त्याने चित्रांमधून रेखाटले आहेत. पुण्यामध्ये त्याने नुकतेच एक सोलो प्रदर्शन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
सचिन खरात
पुरातनकाळातील स्त्री सौंदर्य हा सचिनच्या चित्रांचा विषय आहे. स्त्रियांचे भावविश्व, सुख-दु:खाच्या कल्पना, यातना आदी गोष्टी चित्रांमध्येदिसून येतात. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्याचे नुकतेच प्रदर्शन झाले आहे. ५० हजारहून अधिक किमतीला चित्रे विकली गेली.