आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur's Rutika Won Gold Medal In National Highborad Diving

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरच्या ऋतिकाचे विक्रमासह सुवर्णपदक, १० मीटर राष्ट्रीय हायबोर्ड डायव्हिंगमध्ये २३२ गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तिरुवअनंतपूरममध्ये३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऋतिका श्रीरामने जलतरणातील डायव्हिंग प्रकारात नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करताना तिने १० मीटर हायबोर्ड डायव्हिंगमध्ये २३२ गुण मिळवून विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी हा विक्रम महाराष्ट्राच्याच योगिता वाळूंजच्या (२२५ गुण) नावे होता. दिल्लीच्या दीप्ती पनवार पश्चिम बंगालच्या तनुकार धारा यांनी अनुक्रमे रौप्य कांस्य पदक मिळवले. हे तिन्ही खेळाडू रेल्वेत सेवेत आहेत.

सुवर्णऋतिका !
*१० मीटरहायबोर्ड डायव्हिंगमध्ये २३२ गुण
योगिता वाळूंज (यापूर्वी)
*१०मीटरहायबोर्ड डायव्हिंगमध्ये २२५ गुण