आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरातील दोघा तरुणांची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर शहर जिल्ह्यातील तरुण आपल्या प्रतिभेने सर्वच क्षेत्रात चमकत आहेत. सांगोला सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या जयंत लाडे या तरुणाने कोटी बजेट असलेल्या पेइंग घोस्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शुक्रवार, २९ मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रासह सोलापुरातील चित्रमंदिर चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. लाडे यांच्या या धाडसाला सहनिर्माता म्हणून पंढरपूरचे रोहन शिंदे-नाईक यांनी तोला-मोलाची साथ दिली आहे.
अलिकडच्या काळात कला आणि मनोरंजन क्षेत्रात सोलापूरच्या नव्या पिढीची नावे झळकत आहेत. अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे यांनी आपला ठसा उमटला आहे. त्यानंतर जयंत लाडे रोहन शिंदे या अवघ्या २५ ते २७ वर्षांतील तरुणांनी निर्मिती क्षेत्रात धाडसी पाऊल टाकले आहे. दोघेही शेतकरी कुटुंबातील तरुण. चित्रपट क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना आज मराठी चित्रपटात आपले नशीब आज मावत आहेत.
परदेशात प्रमोशन होणारा पहिला चित्रपट
मराठीचित्रपटात प्रथमच ७० मिनिटाचं व्हिज्युअल इफेक्टस दाखवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत असा प्रयोग मराठीत झालेला नव्हता. हॉलीवूडच्या तंत्रज्ञाच्या मदतीने हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे.या व्हिज्युअल इफेक्टसमुळे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ठ बनला आहे. युनायटेड किंगडममधील लंडन, बेलफार्ड, ब्रहिमगॅम, लायस्टर, मँचेस्टर, स्लॉग या शहरात चित्रपटाचे प्रमोशन होणार आहे. परदेशात प्रमोशन होणार पेइंग घोस्ट हा पहिला चित्रपट ठरणार आहे.
जिल्ह्यातील लाडे शिंदे यांचा परिचय
लाडेयांचे प्राथमिक शिक्षण सांगोल्यात झाले. शिवाय मनोरंजन क्षेत्रात वेगळे काही तरी करण्याकरता त्यांनी पुण्यात मीडिया या विषयात एमबीए केले. त्यानंतर वेगळे काही तर करण्याची इच्छाशक्ती घेऊन मुंबई गाठली. सुरुवातीला महादेव, नव्या या सारख्या मालिकेतून छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. त्यानंतर २०१४ मध्ये चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. त्यावेळी व. पु. काळे यांची बदली ही कथा त्यांना आवडली. या कथेवरच चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. पंढरपूर येथील रोहन शिंदे यांनी सोलापुरात पदवीचे शिक्षण घेतलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...