आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वनिर्मित हेलिकॉप्टर उडवण्यासाठी सुरू आहे सोलापूरच्या प्रांजलचा संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लहानपणापासूनच विमानाचे जबरदस्त आकर्षण असणार्‍या सोलापूरच्या प्रांजलने हेलिकॉप्टर बनवले; पण तांत्रिक नियमांच्या कचाट्यातून त्याचे स्वप्न अधांतरीच राहिले. यामुळे हताश झालेल्या या हौशी तरुणाने स्वनिर्मित हेलिकॉप्टर नष्ट करून टाकले. त्याने स्वप्न विसरायचा प्रयत्न केला; पण त्याला ते शक्य झाले नाही. आता त्याने पुन्हा एकदा साहित्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याच्या संघर्षावर ही चित्तरकथा.

बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रांजलचे तसे एरोमॉडेलिंग किंवा पायलटचे म्हणावे तसे शिक्षण झालेले नाही. मात्र, बालपणापासूनच त्याला विमानाचे वेड होते. हरिभाई देवकरणमध्ये शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर प्रांजल पुढील शिक्षणासाठी पुण्यात पोहोचला. गरवारे महाविद्यालयातून बीएस्सीचे शिक्षण घेऊ लागला. त्याच वेळी तो एनसीसीच्या एअरविंगमध्ये दाखल झाला. नंतर तो राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत एरोमॉडेंलिग प्रशिक्षक म्हणून काम करू लागला. नंतर तो मायक्रोलाइट 2 आसनी विमाने उडवू लागला. विमान चालवण्याचे अनुभव त्याला विमानाच्या अधिक जवळ घेऊन गेला. इतके जवळ की स्वत:च हेलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न तो पाहू लागला.

हाती पैसा नाही, मात्र आपल्या प्रतिभेच्या बळावर त्याने हेलिकॉप्टर बनवण्याचे काम सुरू केले. दोन महिन्यांच्या अथक पर्शिमानंतर त्याने अजिंक्य नावाचे भारतीय बनावटीच हेलिकॉप्टर बनवले. लांबीला 11 फूट आणि 11 फुटांचा वरचा पंखा बसवला. 10 लिटरची पेट्रोल टाकी. स्टेनलेस स्टील, फायबर, अँल्युमिनियम, लाकूड यांचा वापर करून त्याने हेलिकॉप्टर बनवले. हेलिकॉप्टर बनवले आणि त्याच्यासमोर अनेक अडचणी दत्त म्हणून उभ्या राहिल्या. त्या अडचणींनी तो खचून गेला. हतबल ठरला आणि स्वनिर्मित हेलिकॉप्टर स्वत:च नष्ट केले; पण त्याचे ते स्वप्न त्याला झोपू देईना. जीवनाचे एकच ध्येय - हेलिकॉप्टरची निर्मिती करणे. आता तो पुन्हा कामाला लागला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काय आल्या अडचणी...