आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जेमुळे गाव भारनियमनमुक्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील बिरोबा वस्ती सौरऊर्जेच्या वापरामुळे उजळली आहे. सोलापूरजवळच असलेले गाव सोलार संचच्या वापरामुळे पूर्णत: भारनियमनमुक्त झाले आहे.


हे गाव तसे अंधारातच होते. शहर जवळ असूनही सोयी-सुविधांविना निर्जन बेटासारखी या वस्तीची स्थिती होती. या वस्तीच्या हाकेच्या अंतरावर गंगेवाडी, कासेगाव, उळेगाव, तामलवाडी अशी गावे आहेत; पण ही वस्ती दुर्लक्षित होती. गरज असल्याने दीड वर्षापूर्वी रोटरी क्लब आॅफ सोलापूर ईस्ट यांच्या वतीने गावात दहा सोलार पॉवर संच बसवण्यात आले. यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. याशिवाय एक हजार झाडे लावून ती जगवण्यात येत आहेत.

माझ्या कारकीर्दीत आम्ही रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टकडून कासेगाव हे विकासकामांसाठी दत्तक घेतले. वाळूचे बंधारे बांधले, हरित सोलापूर संकल्पनेतून एक हजार झाडे लावून जगवत आहोत. दीड किलोमीटरवरून पाणी आणून शुद्धीकरण यंत्र बसवले आहे. तसेच तीन लाख रुपये खर्च करून दहा सौर दिवे लावले आहेत.’’-
शैलेंद्र सुराणा, प्रेसिडेंट 11-12, रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट

आमच्या गावात सौर दिवे लागल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे. यामुळे गावाचा कायापालट झाला आहे. हे दिवे सायंकाळी साडेसहा ते सकाळी साडेसहापर्यंत विनाव्यत्यय चालू असतात. शिवाय प्रकाशही प्रखर असतो.’’-
नागनाथ भाजीभाकरे, ग्रामस्थ

- निसर्ग आपल्या गरजा भागवण्यास सक्षम आहे. पाणी, सूर्यप्रकाश, हवा या स्रोतांचा वापर करून मानवी जीवन सुकर करता येते. आमच्या वस्तीला सौर दिव्यांमुळे खूपच फायदा झाला आहे. रोटरीचे काम खरेच वाखाणण्याजोगे आहे.’’- रामभाऊ चौगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य