आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या रेल्वे प्लॅटफाॅर्मच्या छतावर असेल सौरऊर्जा संच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या वाढीव भागावरील छताचा उपयोग वीज मिळवण्यासाठी करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. या नव्या छतावर सौरऊर्जा संच बसण्यात येणार आहे. यासाठी दीड कोटी रुपये खर्च असल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. यातून रोज १३०० वॅट वीज मिळू शकेल.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासन वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करून वेगवेगळ्या कारणांवर होणारा खर्च कमी करित आहे. त्याच प्रकारे उत्पन्न वाढीसाठीही वेगळे प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. जर असे झाले तर सोलापूर रेल्वे स्थानक सोलर शेड असलेले देशातील पहिले स्थानक ठरेल. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
>एका संचातून १० वॅट वीज मिळेल. सुमारे १३० संच लागतील.
>वाढवलेले फलाट सुमारे दीडशे मीटरचे आहे. त्याच्या छतावर सौरऊर्जेचे संच बसवण्यात येतील.

रेल्वे प्रशासनाने ऊर्जा निर्मितीसाठी काही दिवसांपासून अन्य पर्याय म्हणून सौरऊर्जेचा वापर सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी टिकेकरवाडी सांगोला रेल्वे स्थानकाला सौरऊर्जेवर चालणारे स्थानक म्हणून जाहीर केले आहे. सोलापूर विभागातील ही दोन रेल्वे स्थानके मध्य रेल्वेतील पहिले आणि दुसऱ्या क्रमांकाचे ग्रीन स्टेशन म्हणून ओळखली जात आहेत. सोलापूर येथील रेल्वे हॉस्पिटलही सौरऊर्जेवर चालणारे आहे.

सुमारे दीड कोटी खर्चाचे नियोजन
रिकाम्या जागी सौरऊर्जा संच

रेल्वेप्रशासनाकडून इमारतीच्या छताची पाहणी सुरू आहे. यात सोलापूरचा मालधक्का वगळता, बाळे, कुर्डुवाडी, पंढरपूर कवठे महांकाळ येथील मालधक्क्याचा समावेश आहे. सोलापूरच्या मालधक्क्यावर शेड असल्याने तेथे सौरऊर्जा संच बसविण्यात येणार नाही.

सोलर शेड उभारणार
रेल्वेप्रशासन सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी अाग्रही आहे. त्यानुसार आम्ही विभागातील मालधक्के सोलापूर स्थानकावरच्या फलाटावर सोलर शेड उभारणार आहोत. याची प्रक्रिया सुरू आहे.” जॉनथॉमस, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...