आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीची दुकानदारी; कुठे लॅपटॉप, कुठे शिक्षण शुल्कात माफी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अभियांत्रिकी प्रवेशासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा यासाठी विविध योजनाही जाहीर केल्या जात आहेत. यामुळे अभियांत्रिकी प्रवेशावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना खास सवलतीही जाहीर होत आहेत.

बेलाटी येथील ब्रrादेवदादा माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप किंवा फी सवलत अशी ऑफर दिली आहे. सीईटीत 100 पेक्षा जास्त गुण असणार्‍या विद्यार्थ्यांस एक ब्रँडेड लॅपटॉप मिळेल किंवा शैक्षणिक फी मध्ये 25 टक्के सवलत मिळेल. 60 ते 100 गुण असेल तर अशा विद्यार्थ्यांना 20 टक्के सवलत दिली आहे. बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे विशेष सवलती देण्याची तयारी दर्शविली आहे.

शहर व जिल्ह्यात 15 अभियांत्रिकी महाविद्यालयातून विविध शाखेच्या सुमारे 4 हजार 400 इतक्या जागा आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातून 9 हजार 800 विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. यातील 8 हजार 600 विद्यार्थी सीईटी उत्तीर्ण झाले आहेत. नॉन झिरो म्हणजे सीईटीत केवळ एक गुण पडला तरी अभियांत्रिकीत प्रवेश मिळू शकतो. मात्र, सीईटीत जास्तीत जास्त गुण पटकाविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयांचीही स्पर्धा असल्याचे दिसून येते आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन पसंतीक्रम देण्यासाठी प्रारंभ झाला आहे. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. अभियांत्रिकीसाठी प्रेफरन्स देण्यासाठी उद्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे.

विद्यापीठाला 12 ब मान्यता मिळाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहेच, त्याशिवाय दज्रेदार असे अभियांत्रिकीचे शिक्षण देणार्‍या संस्था सोलापूर जिल्ह्यात आहेत. यामुळे सोलापूरचा औद्योगिक विकास झपाट्याने साधला जात आहे. साहजिकच स्थानिक उमेदवारांना त्या प्रमाणात संधीही मिळत आहे. एनटीपीसी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रिसिजन, भारत फोर्ज, लक्ष्मी, बिर्ला सिमेंट, बालाजी अमाईन्स, थरमॅक्स, सर्वाधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, आदी ठिकाणी जिल्ह्यातील अभियंत्यांना प्राधान्य मिळत आहे.

सर्व सोयींचा विचार करा
मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, एमबीए बरोबरच बायोमेडिकल, केमिकल इंजिनिअरिंग सारखे महत्त्वाच्या शाखा नामवंत महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असल्यामुळे येथील महाविद्यालयांना प्राधान्य द्यावे. जिल्ह्यात प्रवेश घेतल्यास बाहेरगावी राहण्याचा, मेसचा, प्रवासाचा, हॉस्टेलचा खर्च वाचेल. याचा विचार विद्यार्थ्यांनी व पालकांनी करावा

सोलापुरातील महाविद्यालये
वालचंद अभियांत्रिकी (शहर), ए. जी. पाटील अभियांत्रिकी (सोरेगाव), व्हीव्हीपी अभियांत्रिकी (सोरेगाव), बीएमआयटी अभियांत्रिकी (देगाव), भगवंत अभियांत्रिकी (बार्शी), वैराग अभियांत्रिकी (वैराग), कॉलेज ऑफ इंजिनिअर (गोपाळपूर , फॅबटेक अभियांत्रिकी (सांगोला), कर्मयोगी अभियांत्रिकी (शेळवे, पंढरपूर), आर्किड अभियांत्रिकी (हिप्परगा), सिंहगड अभियांत्रिकी (केगाव), सिंहगड अभियांत्रिकी (कोर्टी, पंढरपूर), सहकार महर्षी अभियांत्रिकी (अकलूज).

दर्जेदार संस्थेचा विचार
विद्यार्थी व पालकांनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी भरमसाठ फी भरून इतरत्र जाण्यापेक्षा दज्रेदार शिक्षण मिळणार्‍या संस्था सोलापुरातच असल्याने त्या दृष्टीने विचार करावा, असे आवाहन सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे संस्थापक प्रा. सतीश राजमाने यांनी केले आहे.

सोलापूरचे नाव वाढले
दज्रेदार अभियांत्रिकी शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड दुसर्‍या जिल्ह्यातील विद्यार्थीही करतात, असा अनुभव आहे. दज्रेदार शिक्षणासाठी सोलापूरचे नाव जोडले गेले आहे, असे मत वालचंद अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी व्यक्त केले.