आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some People Arrested For Supporting Suicide At Solapur

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्टोव्हच्या भडक्यात गंभीर जखमी झालेल्या विवाहित महिलेवर उपचार चालू असतानाच मृत्यू ओढावला आहे. दरम्यान याप्रकरणी संबंधित विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सासरच्या मंडळींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

प्रियंका गणेश शिंदे (वय 22, रा. तिर्‍हे, उत्तर सोलापूर) ही महिला 8 जानेवारी रोजी गंभीररीत्या जखमी झाली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सिव्हिल पोलिस चौकीत स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका झाल्यामुळे ती जखमी झाल्याची नोंद करण्यात आली होती. संबंधित जखमी महिलेवर 21 जानेवारीपर्यंत उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मंगळवारी (दि. 21) दुपारी मृत्यू झाला. यानंतर संध्याकाळी तालुका पोलिस ठाण्यात प्रियंका शिंदे हिचे वडील शंकर धोत्रे यांनी फिर्याद नोंद केली.

फिर्यादीमध्ये त्यांनी प्रियंका हिला एक लाख रुपये माहेरून आणण्याचा तगादा लावला आणि शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली. तिला आत्महत्येसाठी गणेश शिंदे (पती), बबन शिंदे (सासरा), सुनंदा शिंदे (सासू) यांनीच प्रवृत्त केल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार या तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.