आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्‍ये मुलगा, सुनेने पळवले 12 तोळे सोने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मालमत्तेच्या वाटणीसाठी आईबरोबर भांडण काढून मुलगा व सून दोघांनी मिळून बारा तोळे सोन्याचे दागिने पळवले. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला. ताराबाई परशुराम चव्हाण (रा. मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. मुलगा धनंजय, सून कार्तिकी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पाच तोळे बांगड्या, पाच तोळे पाटल्या, दोन तोळे बोरमाळ असे दागिने पळवले, असे फिर्यादित म्हटले आहे. फौजदार आदटराव तपास करत आहेत.

पन्नास हजारांची घरफोडी

सोरेगाव येथील संतोष पवार यांचे घर फोडून चोरट्यांनी 25 हजार रुपये, एक तोळ्याचे गंठण असा ऐवज पळवला. बुधवारी सकाळी सहाच्या सुमाराला ही घटना उघडकीस आली. पवार यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री ते बाहेरगावी गेले होते. कडी-कोयंडा उचकटून कपाटातील दागिने व पैसे चोरट्यांनी पळवले. फौजदार खाडगे तपास करत आहेत.

शेअर ब्रोकरवर गुन्हा

शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी विष्णू किसनसा जित्री (वय 42, रा. कर्णिक नगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दीपंकर गायकवाड (रा. मजरेवाडी) यांनी जोडभावी पोलिसांत फिर्याद दिली आहे. जित्री याने कांचनलक्ष्मी इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी कंपनी काढली होती. गायकवाड यांनी त्यात पैसे गुंतवले. त्यांच्यासह आयटीआय येथील 24 शिक्षकांचीही फसवणूक झाली. गेल्या आठवड्यात न्यायालयाने जित्रीवर गुन्हा दाखल करून तपास कामाचे अहवाल देण्याचे आदेश दिले होते. गायकवाड यांनी वकिलामार्फत न्यायालयात खासगी याचिका दाखल केली होती.

अँम्प्लीफायर चोरीला

देगाव येथील समाज मंदिर बहुउद्देशीय मंडळ व मातंग वस्ती भीमगर्जना तरुण मंडळाच्या मंडपातून 18 हजार रुपयांचा अ96्न;ॅम्प्लीफायर चोरट्यांनी पळवला. दयानंद गायकवाड यांनी सलगरवस्ती पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्नी दहाच्या सुमाराला ते स्पीकर बंद करून केले. बुधवारी सकाळी सातच्या सुमाराला आल्यानंतर अ96्न;ॅम्प्लीफायर चोरीला गेल्याचे लक्षात आले. फौजदार उशिरे तपास करीत आहेत.

ऑइलची चोरी

हैदराबाद रस्त्यावरील चाचा हॉटेलजवळील विजेच्या डीपीतून 100 लीटर ऑइल चोरट्यांनी पळवले. संदीप धुत्तेनवरू यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही चोरी बुधवारी सकाळी उघडकीस आली.

जागेवरून तरुणाला दमदाटी

जागेच्या कारणावरून संजीवकुमार कोळी (रा. शेळगी) यांना तिघांनी मिळून दमदाटी केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमाराला नवीन अक्कलकोट नाक्याजवळील गणपती मंदिराजवळ घडली. सुरेश अल्ले, त्याचे दोन भाऊ मधुकर, अंबादास या तिघांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कोळी हे मोटारसायकलवरून जाताना तिघांनी त्यांना अडवून तुझी जमीन आम्हाला दे असे म्हणत शिवीगाळ, मारहाण केली.