आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्‍ये 86 सोनोग्राफी केंद्रांना टाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधातील व्यापक जनजागृतीमुळे राज्य सरकारने गर्भलिंगनिदान चाचणीच्या विरोधात सरकारने ठाम भूमिका घेतली. प्रशासनाचे प्रयत्न आणि सामाजिक संघटनांचा पुढाकार यामुळे गर्भलिंगनिदानावर काही प्रमाणात अंकुश ठेवणे शक्य झाले आहे. आरोग्य प्रशासनाने आतापर्यंत राज्यभरात कारवाई करून दोन हजार 268 सोनोग्राफी केंद्रांना टाळे ठोकले. सोलापुरात एकूण 86 सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

सोनोग्राफी केंद्रांचा गैरवापर होत असल्याचे दिसून आल्यानंतर आरोग्य खात्याने राज्यभर तपासणी मोहीम हाती घेतली. एका ठिकाणी सोनोग्राफी करणार्‍या रेडिओलॉजिस्टना अन्य केंद्रांवर जाण्यास केंद्र सरकारने मज्जाव केला आहे. तपासण्या सुरू झाल्याने कारवाई टाळण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी स्वत:हूनच केंद्रे बंद केली आहेत. अनेक केंद्रांना कारवाईनंतर टाळे ठोकण्यात आले आहे.

341 नोंदणी रद्द झालेली केंद्रे
10 निलंबित केंद्रे
126 कोर्टाने सील ठोकलेली केंद्रे
185 रेडिओलॉ जिस्ट नसणारी केंद्रे
314 ठिकाणे बदललेली केंद्रे
782 स्वत:हून बंद पडलेली केंद्रे