आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटकात जाऊन गर्भवतींची सोनोग्राफी करण्‍याचे लोण वाढले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहर व जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात येणार असून, येत्या 30 जूनपर्यंत तपासणीचा अहवाल मिळणे अपेक्षित आहे. सोलापूरला लागून असलेल्या कर्नाटकात जाऊन गर्भवती महिलांची सोनोग्राफी करून घेण्याचे लोण वाढल्याची माहिती समोर आली आहे. विशेषत:
विजापूर, गुलबर्गा, शहापूर या शहरांत ही तपासणी होते.
बीड, लातूरसह सोलापुरातील माळीनगरात स्त्री अर्भक सापडल्यामुळे स्त्री भ्रूणहत्येचे लोण गंभीर बनले आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्हा आरोग्य पथक, पोलिस- प्रशासन सक्रिय होऊन घटनेची माहिती घेत आहेत. सोलापुरातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी वारंवार होत असल्यामुळे सोलापुरातील अनेक जण कर्नाटकात जाऊन तपासणी करून घेतात. पण याला पायबंद कसा घालणार, असा प्रश्न आहे. जिल्ह्यात 83 सोनोग्राफी केंद्रे आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी 22 पथके नेमली आहेत. 30 जूनपर्यंत तपासणी करून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. दररोज किती सेंटरची तपासणी केली याचाही अहवाल जिल्हाधिकाºयांना देणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दि. नी. रावखंडे यांनी दिली. या पथकात वैद्यकीय अधिकारी, नायब तहसीलदार यांची नियुक्ती आहे. अकरा तालुक्यांत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.