आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण येणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मिरवणूक काळातील प्रदूषण रोखण्याकामी पोलिस यंत्रणा आणि प्रदूषण मंडळाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. यंदाही मंडळांनी नेहमीप्रमाणे इको-फ्रेंडली गणेशोत्सवाची हाक दिली. पोलिसांनीही मंडळांना तशा सूचना देण्याचा चंग बांधला आहे. जनजागृती कागदावरच राहू नये, अशी अपेक्षा सामान्य सोलापूरकरांची आहे.

मागील काही वर्षात डॉल्बीला बहुतेक मंडळांकडून फाटा मिळाला होता. मात्र, तो पुन्हा वाजू लागला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला गेल्या वर्षी ध्वनी, हवा व पाणी याची प्रदूषण पातळी वाढल्याचे स्पष्ट आढळले. नोंदी वरच्या कार्यालयात पाठवले. कारवाईचे अधिकार नसल्याची सबब पुढे करत स्थानिक कार्यालयाने पुढील जबाबदारीबाबत हात वर केले.

कारवाई करण्यात येईल
मागीलवर्षी उशिरा मिरवणूक काढल्याचे काही गुन्हे दाखल आहेत. यावर्षी वेळेत मिरवणूक संपवा, असे आवाहन मंडळांना करणार आहोत. ध्वनिप्रदूषणासह इतर नियमाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’ भालचंद्र भालचिम, पोलिस निरीक्षक, विशेष शाखा

अधिकार पोलिसांना
प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. प्रदूषणाची पातळीची माहिती वरिष्ठ कार्यालयांना कळविण्यात येते. या काळात कारवाईचे अधिकार पोलिसांना असून त्यांना आम्ही सहकार्य करतो.’’ शंकर केंदुळे, प्रदूषण नियंत्रण मंडळ