आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Assembly Constituency,Latest News In Divya Marathi

महापौरांसह सत्ताधार्‍यांच्या प्रभागात भाजपची मुसंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात हद्दवाढ भागात येणार्‍या 10 महापालिका प्रभाग आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 67 गावांचा समावेश आहे. या मतदार संघात बहुतेक ठिकाणी काँग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही भाजपने जबरदस्त मुसंडी मारली आहे. काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभागांत भाजपने मताधिक्य घेतले आहे. तसेच, ग्रामीण भागात सत्ताधार्‍यांच्या गावांतही काँग्रेसची पीछेहाट झाली आहे.
दक्षिण सोलापूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे आमदार दिलीप माने करतात. पण या मतदार संघात भाजपचे बनसोडे यांना काँग्रेसचे शिंदे यांच्यापेक्षा 27 हजारांचे मताधिक्य घेतले आहे. शिवाय महापौर अलका राठोड, स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, नगरसेवक नागेश ताकमोगे, शिवलिंग कांबळे, इस्माईल शेख, जयकुमार माने यांच्या प्रभागात काँग्रेसची पीछेहाट झाली. केवळ उपमहापौर हारून सय्यद आणि नगरसेवक मधुकर आठवले, सुशीला आबुटे यांच्या प्रभागात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.
ग्रामीण भागातील 67 गावांचा दक्षिण विधानसभा मतदार संघात समावेश आहे. बनसोडे यांना 53 गावांमधून तर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना के वळ 14 गावांत मतांची आघाडी मिळाली. या मतदार संघात दक्षिण सोलापूरचे तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती मतदार संघ जोडले आहेत. यात सुरेश हसापुरे यांच्या भंडारकवठे गटातून सर्वाधिक 4 हजार 809 मतांची आघाडी भाजपला मिळाली. अप्पाराव कोरे यांच्या मंद्रूप गटातून 2 हजार 223 तर पंचायत समितीच्या सभापती इंदुमती अलगोंडा-पाटील यांच्या होटगी गटातून एक हजार 604 चे मताधिक्य भाजपला मिळाले.
भंडारकवठे येथे शिंदे यांची शेवटची सभा झाली. या गावाने 1033 मतांची आघाडी भाजपला दिली. तर गणातील 10 गावांतून सर्वाधिक 3 हजार 423 आघाडी भाजपला मिळाली. केवळ औज, मंद्रूप या एका गावातून 70 मतांची आघाडी शिंदेंना मिळाली. कंदलगाव येथूनही भाजपला 1386 आघाडी मिळाली. उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती विजया पाटील यांच्या डोणगाव गणासह त्यांच्या बेलाटी गावातूनही शिंदे यांना मताधिक्य मिळाले नाही. आमदार दिलीप माने यांचे बंधू जयकुमार माने, त्यांचे जवळचे मानले जाणारे नागेश ताकमोगे, वेदमती ताकमोगे, महापौर अलका राठोड, स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, शिवलिंग कांबळे यांच्या प्रभागांत काँग्रेसची पीछेहाट झाली आहे.