आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special And Fast Treatment For Varkari In Pandharpur

आषाढी वारी : वारक-यांना मिळणार तत्काळ वैद्यकीय मदत ; 57 अद्ययावत रुग्णवाहिका तैनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातील वारकरी दिंडी सोहळ्याद्वारे पंढरीत दाखल होतात. संत ज्ञानेश्वर व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासह पंढरपूरमध्ये वारकºयांना तत्काळ आरोग्य सुविधा देण्यासाठी 57 अद्ययावत रुग्णवाहिका आरोग्य विभागातर्फे तैनात केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पंढरपुरात वारकºयांची संख्या वाढतीय. एकादशीला संपूर्ण शहर वारक-यांनी गजबजून जाते. ऐन पावसाळ्याचे दिवस आणि एकाच वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन आरोग्य सुविधा तत्पर मिळण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घेतली आहे. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून पालखी सोहळ्यासोबत विविध ठिकाणच्या 57 रुग्णवाहिका आहेत. पालखी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतरही रुग्णवाहिका नियुक्तीच्या ठिकाणी थांबतील. त्यामध्ये औषधोपचाराचे सर्व साहित्य आहे.

इथे थांबणार रुग्णवाहिका
वाळवंटात दोन, नवीन चंद्रभागा बसस्थानक, पोलिस स्टेशन परिसर, सावरकर पुतळा परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, गोपाळपूर रस्ता, नवीन कºहाड नाका, इसबावी डेअरी, उपजिल्हा रुग्णालय, सोलापूर रोड, तीन रस्ता परिसर, सांगोला रस्ता येथे प्रत्येकी एक रुग्णवाहिका थांबणार आहे.
पालखी मार्गावर 93 उपचार पथके
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य सुविधा पालखी मार्गावर कार्यरत राहील. प्रत्येक उपचार पथकामध्ये तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे पथक नेमलेले असेल. तसेच, पालखी मार्गावरील 40 आरोग्य केंद्रांचे 80 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तेथील आरोग्य केंद्रांमध्येच सेवा बजावणार आहेत. पालखी मार्गावर जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचे अंतर व वैद्यकीय अधिकाºयांचे नाव व मोबाइल क्रमांक आदी माहिती असलेले डिजिटल फलक रस्त्यावर जागोजागी लावण्यात आलेले आहेत.

सर्व उपाय योजले
- जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. औषधांचा मुबलक साठा असून, खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवण्यात आल्यात. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पालखी मार्गांवरील जलस्रोतांमध्ये टीसीएल पावडर टाकली आहे.’’ डॉ. सुनील भडकुंबे, जिल्हा आरोग्य अधिकारी