आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षार्थींसाठी धावेल आता विशेष रेल्वेगाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेभरती मंडळाची विविध पदांसाठी परीक्षा होत असते. त्याला हजर राहून परतणाऱ्या परीक्षार्थींची तोबा गर्दी रेल्वेगाडीला होते. त्याचा सर्वात जास्त त्रास तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना होतो. यािवषयी ओरड झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी सोडण्याचा प्रस्ताव आहे.

परीक्षेमुळे दर रविवारी सोलापूरहून सुटणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. सुमारे दोन ते अडीच हजार अतिरिक्त प्रवासी इंद्रायणीने दौंडपर्यंत जातात. परिणामी आरक्षित तिकीटधारकांना आपल्या डब्यात जाणेही मुश्किल होऊन बसते. यावर पर्याय म्हणून सोलापूर रेल्वे विभाग रेल्वेची परीक्षा असलेल्या दिवशी खास गाडी सोडणार आहे. त्यासाठी सोलापूर-कोल्हापूर गाडीचे डबे वापरण्यात येणार आहेत. ती सोलापूर ते दौंड अशी धावेल. सोमवारी सोलापूर रेल्वे विभाग असा प्रस्ताव तयार करणार असून, तो अंतिम मंजुरीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवून देणार आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर येत्या रविवारपासूनच ती सुरू होऊ शकेल. येत्या रविवारी पुन्हा परीक्षा आहे. परिणामी इंद्रायणी एक्स्प्रेसवरचा ताण कमी होण्यास चांगली मदत मिळणार आहे.

गर्दी लक्षात घेत सोलापूर रेल्वे विभागाने दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई येथील मुख्यालयाकडे इंद्रायणी एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची विनंती केली होती. इंद्रायणी एक्स्प्रेस ही मुंबई विभागाची गाडी असल्याने डबे वाढवण्याचा अधिकार मुंबई विभागाला आहे. त्यांच्याकडून सोलापूर विभागाच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही.
सोलापूर-कोल्हापूर गाडीचे डबे देखभालीसाठी सोलापुरात असतात. ते वापरून परीक्षेच्या दिवशी दौंडपर्यंत गाडी चालवण्याचा विचार आहे. उत्तर भारतातून आलेले परीक्षार्थी इंद्रायणीने दौंड गाठतात आणि तेथून पुढचा प्रवास करतात. त्यामुळे केवळ दौंडपर्यंत ही प्रचंड गर्दी असते.

प्रस्ताव सोमवारी पाठवू
*इंद्रायणीलाडबे वाढविण्यास मंजुरी मिळत नसल्याने सोलापूर -कोल्हापूरचे डबे वापरून विशेष रेल्वेगाडी म्हणून सुरू करण्याचा विचार आहे. सोमवारी याचा प्रस्ताव तयार करून तो मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यास मंजुरी मिळताच रविवारी परीक्षर्थींसाठी विशेष रेल्वे धावेल. मुख्यालयाकडून मंजुरीची आशा आहे.” नर्मेदेश्वरझा, वरिष्ठविभागीय वाणिज्य व्यवस्थापक

दुपारी अडीचला सुटेल विशेष रेल्वेगाडी
सोलापूरस्थानकावरून इंद्रायणी एक्स्प्रेस दुपारी दोनला निघते. त्यानंतर पुण्याला जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजताच चेन्नई मेल आहे. त्यामुळे विशेष गाडी दुपारी अडीच वाजता सोडण्याचा प्रस्ताव आहे. अडीच वाजता ही गाडी निघाल्यानंतर दाैंडला ती साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास पोचेल. त्यानंतर ती लगेच माघारी फिरून सोलापूरला रात्री साडेनऊच्या सुमारास पोहोचेल. अशा पद्धतीचे वेळापत्रक आखण्यात येणार आहे. त्यानंतर ही गाडी रात्री साडेअकराला नेहमीप्रमाणे मूळच्या प्रवासासाठी कोल्हापूरला रवाना होईल.