आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीनिमित्त आज मिरवणूक; बंदोबस्तात हजार पोलिसांचा ताफा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात आज शिवजयंती मिरवणूक आहे. सुमारे एक हजार पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी ठेवला आहे. सकाळी सात ते रात्री बारा या वेळेत वाहतूक मार्गात बदल आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
शहरातील २८३ मंडळांनी शिवजन्मोत्सव साजरा केला आहे. त्यापैकी मुख्य पंचवीस मंडळे मिरवणुकीत सहभागी होत आहेत. संभाजी आरमारतर्फे सकाळी रॅली निघेल. बंदोबस्ताची माहिती उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. मिरवणूक पुढे गेल्यानंतर पाठीमागील रस्ता वाहतुकीला खुला ठेवणार असल्याचे पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी सांगितले.
मिरवणूक मार्ग : डाळिंबी आड मैदान येथून सुरुवात. शिंदे चौक, सरस्वती बुक डेपो, नवी पेठ पारस इस्टेट, मेकॅनिक चौक, शिवाजी चौक, तरटी नाका पोलिस चौकी, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, कसबा चौकी, खाटीक मश्जिद, दत्त चौक, राजवाडे चौक, जुने विठ्ठल मंदिर ते चौपाड, डाळिंबी आड.
पर्यायी मार्ग : सात रस्ता, मोदी पोलिस चौकी, रेल्वे स्टेशन, भय्या चौक, कल्पना टॉकीज, निराळे वस्ती, हॉटेल अॅम्बेसेडर, बस स्थानक, जुना पुणे नाका. सात रस्ता, रंगभवन, सिव्हील चौक, व्हिको प्रोसेस, शांती चौक, जुना बोरामणी नाका, मड्डी वस्ती, जुना तुळजापूर नाका मार्गे ते जुना पुणे नाका.
दारूविक्री बंद ठेवण्याची मागणी
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सर्व दारूविक्री दुकाने आणि बार बंद ठेवण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आली. शिवजयंती मिरवणुकीत मद्यप्राशन करून काही समाजकंटक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. त्याला यामुळे पायबंद बसेल. या दिवशी ड्राय डे जाहीर करावा, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या वेळी शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, श्रीकांत सराटे, अभिषेक खटके, अतुल शिरसट आदी उपस्थित होते.