सोलापूर- छोट्या पडद्यावरील ‘जय मल्हार’ मालिकेने मराठी रसिकांच्या मनावर गारूड घातलं आहे. विशेष म्हणजे ‘जय मल्हार’ मालिकेत बानूची भूमिका साकारणारी ईशा केसकर ही मूळची वैराग ची (बार्शी) आहे. नाट्य, एकांकिका आणि चित्रपटांमधून भूमिका साकारणारी ईशा
आपल्या जिवंत अभिनयाने महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
अकाउंटंट म्हणून काम करणारे बाबा तर एका कंपनीत काम करणारी आई अशी ईशाच्या कटुंबाची पार्श्वभूमी आहे. सामान्य कुटुंबातून पुढे आलेली ईशाने स्वबळावर अभिनयात यश मिळवले आहे.
सरदारही सोलापूरचा
मूळचे सोलापूरचे असलेले नाट्य कलावंत प्रशांत बनसोडे हे मािलका चित्रपटांत काम करत आहेत. जय मल्हार या मािलकेत तो सरदार म्हणून भूमिका वठवत आहे.
अशी मिळाली मालिका
सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ईशाला जपानी भाषा शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. एके दिवशी ‘कोठारे प्रॉडक्शन’ची ऑडीशन आहे असा निरोप आला. त्यावेळी ईशाला जपानलाही जायची संधी आली होती. हे की ते असे निवडायची वेळ ईशावर आली. आई-बाबांनी शेवटची संधी घ्यायला हरकत नाही, असे सूचवले. इशाच्या रूपाने बानू मिळाली.
असा आहे प्रवास
पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजात पहिल्या वर्षात पदार्पण करताच ईशाने पुरुषोत्तम करंडक, आयएनटी, सवाई असे महोत्सव गाजवले. कला-नाट्य क्षेत्रात सहभागासाठी ती प्रयत्न करू लागली. सुरुवातीला एकांकिका, लघुपट मग व्यावसायिक नाटक असे अनुभव घेत ती ‘जय मल्हार’ मालिकेपर्यंत येऊन ठेपली.
बाबाच माझी प्रेरणा
- जय मल्हार मालिकेच्या ऑडिशनला जाताना बाबांनी एक प्रयत्न कर. आपणास हवे ते क्षेत्र आपली वाट पहात असतेच. अशी प्रेरणा दिली होती.
ईशा केसकर, अभिनेत्री