आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Team For Science And Maths Paper Suring EXam

इंग्रजी, गणित विज्ञानाच्या पेपरसाठी विशेष भरारी पथक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कडक मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर बैठे दक्षता पथके असतीलच. तसेच इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षेवेळी विशेष भरारी पथक कार्यरत असेल. यात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
या विषयांच्या परीक्षेस कॉपी करण्याचे गैरप्रकार वाढतात. त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कॉपीमुक्त परीक्षेचा हा सोलापुरी पॅटर्न पुणे विभागात यंदा लागू केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत होणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा ते २६ मार्च दरम्यान होणार आहे. या सदंर्भात नियोजनासाठी केंद्र संचालकांची बैठक बुधवारी झाली.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे हॉलमध्ये झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख उपस्थित होते. परीक्षा कॉपीमुक्त राबवा, असे आवाहन त्यांनी केले.
इंग्रजी, गणित विज्ञानाच्या परीक्षेवेळी भरारी पथकाची (फ्लॉइंग स्काॅड) नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये तहसीलदार, प्रांत अधिकारी आदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त अश्विनी सानप, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्यासह गौतम जगदाळे, मनीषा कुंभार, मदन मुकणे आदी अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, काही विद्यार्थी वर्षभर अभ्यास करायचा नाही, परीक्षेत गैरप्रकार करून परीक्षा पास होण्याच्या उद्देशाने येऊन परीक्षा देत असतात. परंतु वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांचे मात्र नुकसान होते. यामुळे गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करावे. तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असेही ते म्हणाले.

बारावीसाठी एकूण परीक्षार्थी : ४४ हजार ३०२
दहावीसाठी एकूण परिक्षार्थी : ६६ हजार ९५
दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी मिळणार
बारावीसाठी केंद्र : ७६
दहावीसाठी केंद्र : १४१
बारावीसाठी पर्यवेक्षक कार्यालय : १२
दहावीसाठी पर्यवेक्षक कार्यालय : १०
प्रत्येक केंद्रावर बैठे पथक

सोलापुरी पॅटर्न असा

प्रत्येक केंद्रावर झडती पथक. प्रवेश देतानाच होणार विद्यार्थ्यांची झडती. प्रत्येक केंद्रावर बैठे दक्षता पथक असेल. भरारी पथक संख्या सहा असेल. परीक्षेचे चित्रीकरण करण्यात येईल. कॉपी करताना आढळल्या थेट गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था आहे. अशा बंदोबस्तामुळे मागील वर्षी काॅपीचे केवळ ५६ गैरप्रकार आढळले होते. एरवी कॉपी करणयाचे प्रकार किमान दीडशेच्यावर सापडत असत.

सोलापूर पॅटर्नचा पुणे विभागात अंमल

गेल्यावर्षी उत्तमप्रकारे कॉपीमुक्त परीक्षा यशस्वी राबवण्यात आल्या. त्यामुळे यंदापासून सोलापूरचा पॅटर्न राज्यभर राबवण्यात येत आहे. त्यामुळे आणखी जबाबदारी सोलपूरवर वाढली आहे. परीक्षा कॉपीमुक्त राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही शिक्षणािधकारी लक्ष्मण पोले यांनी सांिगतले.

१४४ कलम लागू

परीक्षा केंद्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील झेरॉक्स दुकाने चालू राहणार नाहीत. कायद्या सुव्यवस्था राबवण्यासाठी पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.