आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारी : पंढरपूरसाठी रेल्वेच्या 80 फे-यांचे नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर रेल्वे प्रशासनाने पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या काळात विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांच्या 80 फे-यांचे नियोजन केले आहे. त्या 3 ते 12 जुलै दरम्यान धावणार आहेत, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेत राज्याच्या कानाकोप-यातून भाविक पंढरपुरात दाखल होतात. रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्या अधिक असते. पंढरपूर, कुर्डुवाडी आदी भागातून रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्या जास्त असल्याने रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन अमरावती -पंढरपूर-अमरावती, मिरज-उस्मानाबाद- मिरज विशेष पॅसेंजर, दौंड-पंढरपूर-दौंड, लातूर -पंढरपूर -लातूर, पंढरपूर -कु र्डुवाडी -पंढरपूर आदी विशेष गाड्या धावणार आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावरून दुपारी दोनला निघणारी गाडी अकोला, शेगाव, नांदुरा,भुसावळ, जळगाव, मनमाड,अहमदनगर, दौड, भिगवण,जेऊर,कु र्डुवाडीमार्गे पंढरपूरला दुस-या दिवशी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूरवरून गाडी दुपारी चार वाजता निघेल. वरील सर्व मार्गावर थांबा घेऊन ही गाडी अमरावतीला सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.

मिरज -उस्मानाबाद ही गाडी दररोज धावेल. मिरजेवरून सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी निघेल. उस्मानाबादल रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल. तर हीच गाडी उस्मानाबदहून पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी निघेल आणि मिरजेला सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी पोहोचणार आहे.
दौंड -पंढरपूर विशेष पॅसेंजर गाडी दौंडवरून पहाटे चार वाजून 5 मिनिटांनी निघेल आणि पंढरपूरला सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. तर हीच गाडी पंढरपूरहून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी निघून दौंडला दुपारी 1 वाजता पोहोचेल. लातूर -पंढरपूर ही गाडी लातूरहून सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी निघेल आणि पंढरपूरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. हीच गाडी पंढरपूरहून दुपारी 2 वाजता निघून लातूरला सायंकाळी 7 वाजता पोहोचणार आहे.
विशेष पॅसेंजर
पंढरपूर -कुर्डुवाडी ही विशेष पॅसेंजर गाडी पंढरपूरहून सकांळी 10 वाजून 35 मिनिटांनी निघेल आणि 11 वाजुन 25 मिनिटांनी पोहोचेल. हीच गाडी कुर्डुवाडीहून दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी निघून पंढरपूरला 4 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल.
फोटो - डमी पिक