आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ तिकीट उशिरा काढणे आता पडेल महाग, तिरुपतीसाठी विशेष रेल्वेगाडी धावणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तत्काळ कोट्यातील तिकीट उशिरा काढणे आता महाग ठरणार आहे. तिकीट दराच्या किमान तीस टक्के जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. तत्काळच्या पहिल्या पन्नास टक्के तिकिटांसाठी सध्याचा दर आहे. मात्र, त्यापुढील तिकिटांसाठी जास्त दर अणार आहे.

रेल्वे प्रशासनाने डायनॅमिक िसस्टिम तत्काळ कोट्यासाठी लागू केली आहे. ती सध्या लांब पल्ल्याच्या महत्त्वाच्या गाड्यांसाठी आहे. यामुळे लागू केलेल्या गाड्यांच्या बाबतीत रेल्वेचे तत्काळचे उत्पन्न किमान ३० टक्के वाढणार आहे. सोलापूरहून जाणाऱ्या मुंबई-नागरकोईल मुंबई-कन्याकुमारी या दोन गाड्यांना लागू करण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांना दोन -दोन महिने वेंटिग असते. त्यामुळे काही प्रवासी तत्काळ तिकीट घेण्यावर भर देतात. विमानाच्या ितकिटांसाठी वापरली जाते तीच डायनॅमिक पद्धत येथे वापरली आहे. म्हणजे, जो प्रवासी सर्वात उशिरा तिकीट घेण्यासाठी येईल, त्याला सर्वात जास्त दर द्यावा लागणार आहे. तत्काळ कोट्याचे दोन भाग केले आहे. पहिला भाग साधारण तर दुसरा डायनॅमिक असे वर्गीकरण केले आहे. कोट्यातील पहिल्या भागातून ५० टक्के तिकिटांची विक्री झाल्यानंतर पुढील तिकीटे डायनॅमिक कोट्यातून मिळतील.

बालाजीला जाताना...
सोमवारीसायंकाळी ७.३५ वा. सोलापुरातून, मंगळवारी सकाळी १० वा. रेणीगुंटाला
बालाजीहून येताना...
सोमवारीपहाटे वाजता : रेणीगुंटातून. मंगळवारी सकाळी ६.४० वा. सोलापुरात.

या गाड्यांना सुविधा
दादर-पाँडेचरी,दादर- तिरुनेवल्ली, कोल्हापूर- अहमदाबाद, पुणे -वेरावल, पुणे - जोधपूर, पुणे -भूज, दादर -करमाळी जन शताब्दी, कुर्ला -हावडा, पुणे -हावडा आझाद हिंद, मुंबई - हावडा मार्गे नागपूर, कुर्ला -शालिमार, कुर्ला - मुझफ्फरपूर एक्स्प्रेस, कुर्ला -दरभंगा आदी प्रमुख गाड्यांचा समावेश आहे.

तत्काळचेअसे दर
गाडीच्याएकूण आसनापैकी २० टक्के आसन तत्काळ तिकिटांसाठी असतात. त्यासाठी नियमित आरक्षित तिकिटाच्या दरापेक्षा २० टक्के रक्कम जास्त आकारण्यात येते. हा दर तत्काळच्या पहिल्या पन्नास टक्के तिकिटांसाठी असेल. तर त्या पुढील पन्नास टक्क्यांसाठी ३० टक्के जादा रक्कम द्यावी लागेल.

काही ठराविक गाड्यांसाठी बदल
-रेल्वेप्रशासनाने काही ठराविक गाड्यांसाठी ही पद्धत अवलंबली आहे. जे लवकर तिकीट काढतील त्यांना कमी दर आकारण्यात आले आहे. जे उशिराने काढतील त्यांना जास्त दर द्यावा लागणार आहे.” नरेंद्रपाटील, मुख्यजनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, सोलापूर